स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना पुन्हा एकदा अलर्ट केले आहे. सरकारने पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) लिकिंगला 31 मार्च पर्यंत मुदतवाढ दिल्याने एसबीआयने देखील त्यांच्या ग्राहकांना याची आठवण करून दिली आहे. जर तुम्ही एसबीआय ग्राहक असाल आणि तुमचं आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक नसल्यास तुमची बॅंकिंग सर्व्हिस देखील ठप्प होणार आहे. हे देखील नक्की वाचा: PAN-Aadhaar Linking Deadline: पॅन-आधार जोडणी 31 मार्च पर्यंत करा अन्यथा 'या' आर्थिक दंडाला जावं लागेल सामोरे!
एसबीआयने ट्वीट करत भविष्यात गैरसोय टाळण्यासाठी आणि बॅकिंग सेवेचा आनंद कायम घेण्यासाठी पॅन आधार सोबत लिंक करण्याचा सल्ला देत असल्याचं म्हटलं आहे. हे देखील नक्की वाचा: Aadhaar-PAN Details Mismatch: तुमच्या आधार-पॅन कार्डवर नाव आणि जन्मतारीख वेगवेगळी आहे का? पहा, कसे कराल दुरुस्त?
एसबीआय ट्वीट
We advise our customers to link their PAN with Aadhaar to avoid any inconvenience and continue enjoying a seamless banking service.#ImportantNotice #AadhaarLinking #Pancard #AadhaarCard #AmritMahotsav #AzadiKaAmritMahotsavWithSBI pic.twitter.com/O3qVKJaquk
— State Bank of India (@TheOfficialSBI) January 15, 2022
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी आधार पॅन लिकिंगची मुदर 30 सप्टेंबर 2021 वरून आता 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून आधार-पॅन लिकिंग करता येणार आहे. तसेच 31 मार्च नंतर नागरिकांना दंड देखील आकारला जाणार आहे.
https://www.incometax.gov.in/iec/foportal या वेबसाईटच्या माध्यमातून किंवा मोबाईलवर UIDPAN<12-digit Aadhaar><10-digit PAN> टाईप करून हा मेसेज ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर पाठवून देखील तुम्हांला आधार-पॅन कार्ड लिंक करता येऊ शकतं.