भारतामध्ये सट्टेबाजी हा एक लोकप्रिय स्वरूपाचा सट्टा मटका (Satta Matka) मागील काही वर्षात खूप लोकप्रिय झाला आहे. नशीबाचा भाग आणि कौशल्य याने हा खेळ अनेकांना आकर्षित करत असतो. आज आम्ही सट्टा मटका ची नेमकी सुरूवात कशी झाली? त्याचा इतिहास याची माहिती देणार आहोत. सट्टा मटका ची सुरूवात 1960 च्या दशकात मुंबई मध्ये झाली आहे. सुरूवातीला याला 'आंकडा जुगार' च्या नावाने ओळखलं जात होते. न्युयॉर्क कॉटन एक्सचेंज मध्ये व्यवहार केल्या जाणार्या कापसाच्या बंद होण्याच्या आणि सुरू होण्याच्या दरांवर भविष्यवाणी केली जात असे. तो एक प्रकारचा सट्टा होता.
मिल मजदूरांमध्ये या खेळाची विशेष क्रेझ होती. हळूहळू हा खेळ अन्य वर्गांमध्येही लोकप्रिय झाला. 1961 मध्ये न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंज बंद झाल्यानंतर खेळाच्या स्वरूपामध्ये बदल झाले. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधून आलेल्या रतन खत्री यांनी आंकडा जुगारला नव्या स्वरूपात सादर केलं. ज्याला पुढे मटका संबोधलं गेलं. "मटका" या शब्दाचा अर्थ खेळातील अंक काढण्यासाठी वापरण्यात येणारे मातीचे भांडे असा होतो.
सट्टा मटका ची लोकप्रियता
रतन खत्री याने सुरू केलेल्या मटका ला सुरू करताच त्याला लोकप्रियता मिळत गेली. त्यावेळी हा खेळ 0 ते 9 पर्यंत अंकांच्या निवडीवर आहे. या अंकांना कागदाच्या तुकड्यांवर लिहलं जातं असे आणि तो कागद मटक्यामध्ये टाकला जात होता. नंतर एक व्यक्ती त्या मटक्यामधून 3 अंक काढत होती. त्यामधून एक विनिंग कॉम्बिनेशन बनत होते.
खेळाला पारदर्शी आणि निष्पक्ष बनवण्यासाठी विनिंग कॉम्बिनेशन हे सार्वजनिक ठिकाणी काढली जात होती. यामुळे मोठी गर्दी आकर्षित केली जात होती. ड्रॉ च्या दिवसातून अनेकवेळा काढले जात होते. यामुळे स्पर्धकांमध्ये उत्साह राहत होता. विजेत्यांना मोठी बक्षीसं मिळत होती. त्यामुळे लोकांना याचं आकर्षण होतं.
DpBOSS हा दर दिवशीचा सट्टा मटकाचा निकाल प्रकाशित करते. यामध्ये
मटका चार्ट, भारतीय मटका, कल्याण परिणाम, कल्याण मटका, मटका परिणाम, मटका ऑनलाइन, मार्केट, पैनल चार्ट, फिक्स मटका जोड़ी, बॉस मटका, आणि अन्य माहिती दिली जात असे. What is DpBOSS Satta Matka Website? डीपीबॉस काय आहे? सट्टा मटका बाजारामध्ये त्याची इतकी चर्चा का?
सट्टा मटक्याची लोकप्रियता जसजशी वाढत गेली, तसतसा संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा प्रभावही वाढला. माफियांना गेम नियंत्रित करण्याची आणि त्यांच्या फायद्यासाठी त्याचे परिणाम हाताळण्याची संधी दिसली. त्यांनी मटका ड्रॉमध्ये हेराफेरी सुरू केली, केवळ काही निवडक लोकच जिंकतील, तर बहुसंख्य सहभागींना आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींकडून छाननी वाढली आणि 1965 मध्ये महाराष्ट्र सरकारने सट्टा मटकावर बंदी घातली. या, बंदीमुळे त्याची लोकप्रियता कमी झाली नाही. माफियांकडून शहरभर अवैध मटका अड्डे सुरू असताना हा खेळ भूमिगत सुरूच राहिला. Online Satta King किंवा Satta Matka खेळणं कायदेशीर आहे का? घ्या जाणून .
80-90 च्या दशकात सट्टा मटका ने पाहिले सोन्याचे दिवस
1980 आणि 1990 च्या दशकात, सट्टा मटका शिखरावर पोहोचला. लाखो खेळाडूंना आकर्षित करत आणि प्रचंड कमाई करत होते. या खेळाचा मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम झाला, भूमिगत सट्टेबाजीच्या नेटवर्कमधून मोठ्या प्रमाणात पैसा वाहत होता. या काळात हिंसाचार आणि टोळी शत्रुत्वात वाढ झाली.
वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
आमच्या वाचकांसाठी, LatestLY यावर जोर देते की सट्टेबाजी आणि जुगार खेळणे भारतात कठोरपणे प्रतिबंधित आहे. आम्ही सर्वांनी बेटिंग आणि जुगाराबाबत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करतो. सरकारी वेबसाइट्सद्वारे बेकायदेशीर क्रियाकलापांची जाहिरात ही एक गंभीर समस्या आहे जी या साइट्स सुरक्षित करण्यासाठी आणि सार्वजनिक डेटाचे संरक्षण करण्यासाठी त्वरित कारवाईची मागणी करते.