Rules Change From 1st November: येत्या 1 नोव्हेंबर पासून 'या' नियमात होणार बदल, जाणून घ्या अधिक
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

Rules Change From 1st November:  ऑक्टोंबर महिना संपत आला असून सोमवार पासून नोव्हेंबर महिना सुरु होणार आहे. अशातच नवे नियम लागू होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर पडणार आहे. नोकरदार वर्ग ते गृहिणींवर ही नव्या महिन्यात बदललेल्या नियमांमुळे प्रभाव पडणार आहे. तर जाणून घ्या नोव्हेंबर पासून कोणत्या नियमात बदल होणार आहेत.(Cryptocurrency: Bitcoin नंतर Ether गाठतय उच्चांक, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये नवा विक्रम)

येत्या 1 नोव्हेंबर पासून गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल होणार असल्याची अपेक्षा आहे. असे मानले जात आहे की, LPG च्या किंमतीत वाढ केली जाऊ शकते. पीटीआयच्या एका रिपोर्ट्सनुसार, एलपीजीची विक्रीवर होणारे नुकसान पाहता सरकार पुन्हा एकदा एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली जाऊ शकते. असे झाल्यास या सर्व कॅटेगरीत घरगुती गॅसच्या किंमतीत पाचव्या वेळेस वाढ होईल.

अमेरिकेत जाण्यासाठी गाइडलाइन्समध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार WHO ने मान्य केलेल्या लसीचा डोस घेतला असेल तरच त्यांना अमेरिकेसाठी प्रवास करता येणार आहे. या नियमाअंतर्गत ज्या लोकांनी लस घेतलेली नाही त्यांना अमेरिकेत प्रवेश करणे मुश्किल होणार आहे.

या व्यतिरिक्त नोव्हेंबर मध्ये बँक सुद्धा काही दिवस बंद असणार आहेत. दुसरा आणि चौथा शनिवार सोबत रविवार सुद्धा आला. त्यामुळे ज्या लोकांना बँकेसंदर्भात महत्वाची कामे आहेत ती उरकून घ्यावी. त्याआधी एकदा बँक हॉलिडे कधी असणार आहे ते सुद्धा पहावे.(नोकरदार वर्गासाठी सरकारकडून दिवाळी गिफ्ट, 6 कोटी लोकांच्या PF खात्यात थेट रक्कम होणार ट्रान्सफर)

आणखी महत्वाचे म्हणजे 1 नोव्हेंबर पासून काही आयफोन आणि अॅन्ड्रॉइड फोनवर व्हॉट्सअॅप काम करणे बंद करणार आहे. व्हॉट्सअॅपने दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबर पासून फेसबुकचे मालकी हक्क आलेले प्लॅटफॉर्म अॅन्ड्रॉइड 4.0.3 Ice Cream Sandwich, iOS 9 आणि KaiOS 2.5.0 सपोर्ट करणार नाही आहे. ज्या स्मार्टफोनमध्ये ते सपोर्ट करणार नाही त्यात सॅमसंग, ZTE, हुवावे, सोनी, Alcatel यांचा समावेश आहे.

दरम्यान, येत्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला एसबीआय कडून नव्या सुविधा सुरु केल्या जाणार आहेत. तर पेन्शन धारकांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एसबीआयमध्ये आपले लाइफ सर्टिफिकेट म्हणजेच जीवन प्रमाणपत्र देता येणार आहे. त्याचसोबत पेन्शन सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक वर्षी बँक, पोस्ट ऑफिस किंवा आर्थिक संस्थेत जमा करावी लागते जेथे पेन्शन जमा होते.