RRB NTPC Recruitment 2019: सरकारी नोकरीच्या शोधात आहात, तर मग ही बातमी तुमच्यासाठी दिलासादायक आहे. रेल्वेत 1 लाख 30 हजार पदांसाठी भरती प्रक्रीया उद्या (1 मार्च, 2019) पासून सुरु होणार आहे. या भरतीअंतर्गत एनटीपीसी (Non-Technical Popular Categories) श्रेणीसाठी पदभरती होणार आहे. यात तिकीट कलेक्टर, टायपिस्ट, टीटीई, असिस्टेंट स्टेशन मास्टर यांसारखी पद येतात. यापूर्वी ही पदभरती 28 फेब्रुवारीपासून सुरु होणार होती. मात्र यात बदल करण्यात आला असून आता ही पदभरती 1 मार्चपासून होणार आहे.
पहिल्या श्रेणीसाठी सर्वाधिक जागा उपलब्ध असून यात पॅरा मेडिकल, स्टाफ, मिनिस्ट्रयल आणि आसोलेटेड कॅटेगरीचा समावेश आहे. यासाठी सुमारे 30,000 पदे उपलब्ध आहेत. 4 मार्चपासून पॅरा मेडिकल स्टॉफसाठी अर्ज सुरु करण्यात येतील.तर तिसऱ्या श्रेणीसाठी म्हणजेच लॉ असिस्टेंट, ज्युनिअर ट्रान्सलेटर यांसारख्या पदांसाठी 8 मार्चपासून पदभरती सुरु होईल.
ग्रुप डीसाठी 1 लाख जागा उपलब्ध आहेत. यात ट्रॅक मेंटेनर, हेल्पर, असिस्टेंट, असिस्टेंट प्वाईंटमॅन आणि अन्य पदांचा समावेश आहे. या पदांसाठी उमेदवार 12 मार्चपासून अर्ज करु शकतात.
गेल्या वर्षी रेल्वे ग्रुप डी ची 63000 जागा उपलब्ध होत्या. यात 1 कोटी 89 लाख उमेदवारांनी परीक्षा दिल्या होत्या.