
दोन दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आज संपूर्ण राज्याचं लक्ष आहे ते म्हणजे या निकालाकडे. सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि जसजसे निकाल समोर येऊ लागतात तेव्हा चर्चेचा विषय ठरते ती म्हणजे मॅजिक फिगर. आता ही मॅजिक फिगर म्हणजे नक्की काय त्याचा घेऊया एक विशेष आढावा.
मॅजिक फिगर म्हणजे बहुमतासाठी लागणारी एकूण आकडेवारी. एकूण राज्यभर जागांची संख्या जेवढी असते त्याच्या निम्म्याहून एकने अधिक संख्या असण्याला मॅजिक फिगर असं म्हटलं जातं.
ही मॅजिक फिगर नक्की कशी ठरते?
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. या आकड्याच्या निम्म्या म्हणजे 144 जागा आणि त्यात किमान अजून एक जागा मिळवायची म्हणजेच 145 ही मॅजिक फिगर झाली.
तर एक्सिट पोलने दर्शवल्यानुसार महायुतीला जर 145+ जागा मिळाल्या तर ते त्यांचं सरकार स्थापन करू शकतात हे मात्र निश्चित आहे.
दुपारी 12 वाजेपर्यंत राज्याच्या नव्या विधानसभेचं चित्र स्पष्ट होईलच परंतु सध्या सुरु असलेल्या मतमोजणी प्रक्रियेनुसार भाजप-शिवसेना महायुती 147 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी हे 97 ठिकाणी आघाडीवर आहेत.