Tech Mahindra New CEO: टेक महिंद्राच्या नवीन MD आणि सीईओची घोषणा; Infosys चे माजी अध्यक्ष Mohit Joshi स्वीकारणार जबाबदारी
Mohit Joshi (PC - Twitter)

Tech Mahindra New CEO: आयटी कंपनी टेक महिंद्राने शनिवारी नवीन एमडी (MD) आणि सीईओ (CEO)च्या नावाची घोषणा केली. कंपनीच्या वतीने इन्फोसिसचे माजी अध्यक्ष मोहित जोशी (Mohit Joshi) यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जोशी सीपी गुरनानी यांची जागा घेतील, जे या वर्षी 19 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. टेक महिंद्राने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहित सध्याचे एमडी आणि सीईओ सीपी गुरनानी यांच्याकडून पदभार स्वीकारतील, जे 19 डिसेंबर 2023 रोजी निवृत्त होत आहेत.

याआधी मोहित जोशी देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसमध्ये प्रमुख भूमिका बजावत होते. येथे ते जागतिक वित्तीय सेवा, आरोग्य सेवा सॉफ्टवेअर व्यवसायाचे प्रमुख होते. ज्यात इन्फोसिसचे बँकिंग प्लॅटफॉर्म फिनाकल, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि ऑटोमेशन पोर्टफोलियो यांचा समावेश होता. (हेही वाचा - भारतीय वंशाचे Arun Subramanian बनणार New York District Court चे न्यायाधीश; पहिल्यांदा दक्षिण आशियाई व्यक्तीकडे हे मानाचं पद)

मोहित जोशी दिल्ली विद्यापीठातून एमबीए आणि सेंट स्टीफन कॉलेजमधून इतिहासात पदवीधर आहेत. इन्फोसिसपूर्वी जोशी यांनी अनेक गुंतवणूक बँकिंग कंपन्यांमध्ये काम केले.

दरम्यान, सध्याच्या टेक महिंद्राचे एमडी आणि सीईओ सीपी गुरनानी यांचे नाव आयटी क्षेत्रात सर्वाधिक काळ एखाद्या कंपनीचे सर्वोच्च पद भूषवणाऱ्या लोकांमध्ये गणले जाते. गुरनानी 2004 मध्ये टेक महिंद्रामध्ये सामील झाले होते. जून 2009 पासून ते टेक महिंद्राचे एमडी आणि सीईओ आहेत.