National Pension Scheme: 'हे' खाते उघडून तुमच्या पत्नीला बनवा आत्मनिर्भर, दरमहा मिळतील 45 हजार रुपये
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

National Pension Scheme: महागाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे एका उत्पन्नाच्या स्रोतातून घर चालवणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत पतीच्या बरोबरीने पत्नीलाही पैसे मिळणे आवश्यक आहे. आता गृहिणीही स्वावलंबी होत आहेत. ऑफिसला न जाता त्या घरबसल्या अनेक ऑनलाइन कामं करत आहे. तुमचीही इच्छा असेल की, तुमच्या पत्नीला कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. तुमच्या गैरहजेरीत घरी नियमित उत्पन्न येत राहावे. मग तुम्ही राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकता. तुम्ही पत्नीच्या नावावर नवीन पेन्शन सिस्टम खाते (New Pension System) उघडू शकता.

NPS खात्यामध्ये पत्नीला दरमहा किती पेन्शन मिळेल हे तुम्ही ठरवू शकता. वयाच्या 60 वर्षानंतर पत्नी पैशासाठी कोणावरही अवलंबून राहणार नाही. तुम्ही या खात्यात दर महिन्याला किंवा दरवर्षी सोयीनुसार पैसे जमा करू शकता. तुम्ही पत्नीच्या नावावर अगदी एक हजार रुपये टाकून NPS खाते उघडू शकता. हे खाते वयाच्या 60 व्या वर्षी मॅच्योर होते. (वाचा - Post Office Scheme: बँक FD पेक्षा जास्त परतावा देते 'ही' पोस्ट ऑफिस स्कीम, वाचा योजनांची संपूर्ण यादी)

45 हजारांपर्यंत मासिक उत्पन्न -

समजा तुमची पत्नी 30 वर्षांची आहे. तुम्ही त्यांच्या NPS खात्यात दरमहा पाच हजार रुपये टाकत आहात. जर तुम्हाला वार्षिक 10 टक्के परतावा मिळत असेल. त्यानंतर वयाच्या 60 व्या वर्षी त्यांच्या खात्यात 1.12 कोटी रुपये असतील. यातून सुमारे 45 लाख रुपये मिळतील. त्याचबरोबर दरमहा 45 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. ही पेन्शन आयुष्यभरासाठी उपलब्ध असेल.

पैसा राहतो सुरक्षित -

NPS ही भारत सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेतील पैसे व्यावसायिक निधी व्यवस्थापकाद्वारे व्यवस्थापित केले जातात. केंद्र सरकार व्यावसायिक निधी व्यवस्थापकांना ही जबाबदारी देते. मात्र, या योजनेत गुंतवलेली रक्कम आणि त्यावरील परतावा मिळण्याची शाश्वती नसते. वित्तीय नियोजकांच्या मते, NPS ने सुमारे 10 ते 11 टक्के वार्षिक परतावा दिला जातो.