फरीदाबाद: भाजप पक्षाच्या पोलिंग एजंटकडून स्वत:हून वारंवार मतदान, आरोपीला अटक (Video)
प्रतिकात्मक फोटो (FILE PHOTO)

फरीदाबाद (Faridabad) येथे मतदान केंद्रावरील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामध्ये मतदान केंद्रावर असलेल्या भाजप (BJP) पक्षाचा पोलिंग एजंट ईव्हीएम मशीनजवळ जाऊन स्वत:हून वारंवार मतदान करताना दिसून आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार,गिरीराज सिंग असे या व्यक्तीचे नाव आहे. सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत असाताना हा प्रकार घडला आहे. याबद्दल निवडणूक अधिकारी अमित अत्री यांनी तक्रार केल्यानंतर आता कारवाई करण्यात आली आहे.

तर या आरोपी व्यक्तिला निवडणूक अधिकाऱ्यांकडून समज देऊन ही तीनचार वेळा स्वत:हून बटण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मतदानासाठी रांगेत असलेले मतदान संतप्त झाल्यानंतर सिंग याने मतदान केंद्रातून पळ काढला. मात्र पोलिसांनी सिंग याचा शोध घेत त्याला अटक करण्यात आली आहे.