Inflation: देशात दुधासह अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढणार, केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना पुन्हा झटका

विविध जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे. दैनंदिन वापरातील वस्तू विकत घेण्यासाठी आता तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार आहे. महागलेल्या या वस्तूंमध्ये खाद्यपदार्थाचा सर्वाधिक समावेश आहे.  चीज (Cheese), लस्सी (Lassi), बटर मिल्क (Butter Milk), दही (Curd), गव्हाचे पीठ (Wheat), इतर धान्ये, मध (Honey), पापड, मांस आणि मासे आणि गूळ या सगळ्या वस्तूंच्या दरात वाढ होणार आहे. या वस्तूंचे नवे दर 18 जुलैपासून लागू होणार आहे. तसेच या वस्तूंवर आकारण्यात येणाऱ्या नव्या जीएसटी (GST) दरामूळे वस्तूंच्या किमतीत मोठा बदल दिसून येणार आहे.

 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली  GST संबंधीत 47 वी बैठक पार पडली. त्या बैठकीत काही वस्तूवरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी या जीवनावश्क वस्तूंचे भाव वाढणार आहेत. म्हणजे आता सर्वसामान्याच्या खिशाला पुन्हा कात्री बसणार आहे. 18 जुलैपासून वाढणाऱ्या या नव्या दराचा फटका संपूर्ण भारतीयांना सोसावा लागणार आहे. दिवसेंदिवस वाढत्या जीएसटीच्या दरामुळे जीएसटी संबंधी सर्वसामान्यांच्या मनात मोठा प्रश्न निर्माण होत आहे. (हे ही वाचा:-7th Pay Commission: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीची शक्यता, लवकरच होणार घोषणा)

 

पुर्वी टेट्रा पॅक दही, लस्सी आणि बटर मिल्कच्या किमतीत जीएसटी आकारण्यात येत नव्हता. पण आता 18 जुलैपासून या सर्व वस्तूंवर 5% जीएसटी आकारण्यात येणार आहे. तसेच आता बॅंकेच्या व्यवहारातही जीएटीची एन्ट्री होणार आहे. चेकबुक जारी करण्यासाठी पूर्वी सेवा कर आकारण्यात येत होता तर आता त्यावरही 18% जीएसटी लागू करण्यात येणार आहे.