Har Ghar Tiranga मध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्टर कसं कराल? harghartiranga.com वरून सर्टिफिकेट डाऊनलोड कसं कराल?
Har Ghar Tiranga

भारत यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणजेच 75 वर्ष साजरी करत आहे. या निमित्ताने जगभरातील भारतीय विविध उपक्रम राबवत आहे. भारतातही यानिमित्ताने देशप्रेम जागृत करण्यासाठी आणि आपल्या देशाप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी हर घर तिरंगा कॅम्पेन(Har Ghar Tiranga Campaign)जाहीर केले आहे. तुम्ही देखील या मोहिमेमध्ये सहभागी होत Har Ghar Tiranga Campaign च्या अधिकृत वेबसाईट harghartiranga.com वर आपला फोटो फीचर करू शकता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट दिवशी सोशल मीडीया प्रोफाईल फोटो भारताचा तिरंगा करून देशवासीयांनादेखील डीपी तिरंगा करण्याचं आवाहन केले आहे. सोबतच घराघरामध्ये तिरंगा फडकवण्याचंही आवाहन केले आहे. देशभरातील शाळा-शाळांमध्ये या मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट वर रजिस्टर करण्यासही सांगितले आहे. 'हर घर तिरंगा' मध्ये सहभागी नागरिकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे देखील नक्की वाचा: Tiranga DP Images, HD Wallpapers for Free Download Online: सोशल मीडीयामध्ये प्रोफाईल पिक्चर 'तिरंगा' ठेवण्यासाठी डाऊनलोड करा 'भारतीय राष्ट्रध्वज' फोटो! 

'हर घर तिरंगा' मोहिमेसाठी रजिस्ट्रेशन कुठे कराल? प्रमाणपत्र कुठे डाऊनलोड कराल?

  • harghartiranga.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • 'Pin a Flag.'वर क्लिक करून रजिस्ट्रेशनला सुरूवात करा. आता तुम्हांला एका नव्या पेज वर नेले जाईल जेथे तुम्हांला फोटो अपलोड करता येईल. नाव, मोबाईल नंबर टाकून 'Next'वर क्लिक करा. 'Continue With Google.'चा देखील पर्याय आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या गूगल अकाऊंट वरून देखील लॉगिन करू शकाल.
  • आता 'Location' पाहण्यासाठी संबंधित फीचर ऑन करण्याची परवानगी द्या.
  • यानंतर लोकेशनवर ध्वजला पिन करा.
  • तुम्ही आता हर घर तिरंगा मोहिमेमध्ये सहभागी झाला आहात. तुम्हांला त्याचं एक ऑनलाईन सर्टिफिकेट दिलं जाईल जे डाऊनलोड करता येईल.

हर घर तिरंगा ही मोहिम 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवली जाणार आहे. ज्यामध्ये तुम्ही सहभागी होण्यासाठी व्हर्च्युअल फ्लॅग पिन करू शकता.