Photo Credit- Pixabay

आधार कार्ड (Aadhaar Card) भारतीयांसाठी महत्त्वाचा ओळखपत्राचा पुरावा आहे. आधार कार्ड हे बॅंकेच्या कामांपासून ते अगदी एअरपोर्ट वर, हॉटेल्स बुकिंगामध्ये वापरलं जाणारं ओळखपत्र आहे. पण अनेक महत्त्वाच्या ठिकाणी त्याचा वापर केला जात असल्याने अनेकांकडून त्याचा गैरवापर देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आता गोपनियता आणि व्हेरिफिकेशन प्रक्रिया सोप्पी करण्यासाठी भारत सरकारने आधार कार्ड सोबत फेस आयडीचा पर्याय आणला आहे. या नव्या स्वरूपातील आधार कार्डाच्या मदतीने आता एखाद्या यूपीआय अ‍ॅप प्रमाणे आधार कार्ड शेअर करता येणार आहे. त्यामुळे त्याची फिजिकल कॉपी देखील जवळ बाळगण्याची गर्ज संपणार आहे. मग आता हे नवे आधार कार्ड कसे मिळवायचे हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर जाणून घ्या त्याची संपूर्ण प्रक्रिया.  नक्की वाचा: Aadhaar App with Face ID झाले लॉन्च; आता कुठेही फोटो कॉपी देण्याची गरज नाही, सर्व कामं UPI प्रमाणे QR कोड स्कॅन करून होणार .

आधार फेस आईडी कसं कराल डाऊनलोड?

  • मोबाईल मध्ये प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअर वरून ‘mAadhaar’ अ‍ॅप डाउनलोड करा.
  • अ‍ॅप डाऊनलोड झाल्यानंतर इंस्टॉल करा.
  • आता आधार नंबर किंवा व्हर्च्युअल आयडी च्या माध्यमातून लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला अ‍ॅप मध्ये अनेक पर्याय मिळतील. ज्यात आधार अपडेट, आधार डाऊनलोड, आधार व्हेरिफिकेशनचा पर्याय असेल.
  • हे अ‍ॅप यूजर्सच्या चेहऱ्याचा लाईव्ह सेल्फी घेते आणि आधार डेटाबेसशी जुळवून त्याची ओळख पडताळते.

आधारची ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आहे. ओळखीची चोरी किंवा फसवणूक कमी करू शकते, विशेषतः जिथे फिंगरप्रिंट ओळखणे कठीण आहे अशा भागात हे आधारकार्ड महत्त्वाचे ठरणार आहे. या नवीन आधार अॅपचा उद्देश डिजिटल ओळख पडताळणी अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर बनवणे आहे.