Holiday Calendar 2019 : पहा नवीन वर्षाच्या सुट्ट्यांची आणि लाँग वीकेंडची संपूर्ण यादी; असे करा नियोजन
दिनदर्शिका 2019 (Photo credit : pixabay)

सुट्ट्यांच्या बाबतीत 2018 मध्ये बरीच चंगळ झाली. यावर्षी अनेक जोडून सुट्ट्या आल्याने लोकांनी बाहेर जाण्याचे अनके प्लान्स बनवले होते. मात्र 2019 मध्ये विकेंडला जोडून फक्त 10 सुट्ट्या येणार आहेत. तसेच यावर्षीचे काही सणदेखील शनिवारी आणि रविवारी आले आहेत, त्या सुट्ट्या वाया गेल्या आहेत. मात्र शनिवार आणि रविवार सोडून अनेक सरकारी सुट्ट्या यावर्षी आल्या आहेत, याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. चला तर पाहूया कशी आहे 2019 ची सुट्ट्यांची दिनदर्शिका.

जानेवारी – जानेवारीमध्ये 12 आणि 13 तारखेला विकेंड आहे.

13 जानेवारी- लोहारी

14 जानेवारी- मकरसंक्रांती

15 जानेवारी- पोंगल

26 जानेवारी- प्रजासत्ताक दिन

फेब्रुवारी – 19 तारखेला मंगळवार आहे, तरी 18 ला, सोमवारची सुट्टी घेऊन तुम्ही सलग 4 दिवस एन्जॉय करू शकता.

10 फेब्रुवारी- वसंत पंचमी

19 फेब्रुवारी- शिवजयंती

मार्च - या महिन्यात 2 आणि 3 तारखेला वीकेंड आहे आणि 4 मार्चला महाशिवरात्री आहे. त्यानंतर 21 तारखेला, गुरुवारी होळी आहे. अशा वेळी तुम्ही 22 तारखेला एक दिवस सुट्टी घेऊन चार दिवसांचे नियोजन करू शकता.

4 मार्च- महाशिवरात्री

21 मार्च- धूलीवंदन

एप्रिल - एप्रिल महिन्यात 19 तारखेला गुडफ्राइडेची सुट्टी आहे. अशा प्रकारे सलग सुट्ट्यांचे तीन दिवस मिळू शकतात.

13 एप्रिल- रामनवमी

14 एप्रिल- आंबेडकर जयंती

17 एप्रिल- महावीर जयंती

19 एप्रिल- गुड फ्रायडे

मे – या महिन्यात एकही लाँग वीकेंड नाही

18 मे- बुद्धपौर्णिमा

31 मे- जमात-उल-विदा

जून - जून महिन्यात सलग 3 दिवसांची सुट्टी नाही

5 जून- रमजान ईद

जुलै – या महिन्यातही सलग 3 दिवसांची सुट्टी नाही

4 जुलै- रथयात्रा

ऑगस्ट - ऑगस्टमध्ये 10 आणि 11 तारखेला वीकेंड आहे आणि 12 ऑगस्टला बकरी ईदची सुट्टी आहे. यानंतर 15 ऑगस्टची सुट्टी आहे आणि 16 ऑगस्टला सुट्टी घेऊन तुम्ही 17 आणि 18 च्या वीकेंडसोबत सलग 4 दिवसांचा काही प्लान करू शकता.

12 ऑगस्ट- बकरी ईद

15 ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन/रक्षाबंधन

24 ऑगस्ट- गोकुळाष्टमी

सप्टेंबर - सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 तारखेला रविवार आहे. त्यामुळे 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबरला वीकेंड आणि 2 सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या सुट्टीसोबत तुम्ही 3 दिवस सुट्टीचा प्लान करू शकता.

2 सप्टेंबर - श्रीगणेश चतुर्थी -

10 सप्टेंबर - मोहरम

12 सप्टेंबर - अनंत चतुर्दशी

ऑक्टोबर – या महिन्यात दोन दिवसांची सुट्टी घेऊन तुम्ही सलग 7 दिवस एन्जॉय करू शकता. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती, 3 आणि 4 ऑक्टोबरला सुट्टी घ्यावी लागेल, त्यानंतर 5, 6 ला वीकेंड, 7 ऑक्टोबरला राम नवमी आणि 8 ऑक्टोबरला दसरा आहे.

2 ऑक्‍टोबर - महात्मा गांधी जयंती

8 ऑक्‍टोबर - दसरा

27 ऑक्‍टोबर - दिवाळी लक्ष्मीपूजन

28 ऑक्‍टोबर - दिवाळी बलिप्रतिपदा

नोव्हेंबर - या महिन्यात 9 आणि 10 तारखेला वीकेंड आणि आणि 11 नोव्हेंबरला सुट्टी घ्या. त्यानंतर 12 नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीची सुट्टी आहे.

10 नोव्हेंबर - ईद-ए-मिलाद

12 नोव्हेंबर - गुरू नानक जयंती

डिसेंबर

25 डिसेंबर - ख्रिसमस