Har Ghar Tiranga अभियानाला आजपासून सुरुवात, 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी फडकणार तिरंगा
Tiranga | (Photo Credit harghartiranga)

यावर्षीचा स्वातंत्र्यदिवस (Independence Day) भारतासाठी (India) खास आहे. कारण 15 ऑगस्ट 2022 ला भारत स्वातंत्र्य होवून 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून हे संपूर्ण वर्ष आपण स्वातंत्र्याचा मृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mohotsav) म्हणून साजरा करत आहोत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबविण्यात येत आहे. आजपासून या अभियानास सुरुवात होत आहे. या अभियाना अंतर्गत नागरिकांनी कार्यालयासह घरोघरी आजपासून म्हणजे 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mohotsav) कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

 

स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात 'हर घर तिरंगा' या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केलं आहे. देशातील नागरिकांचाही या मोहिमेस उत्सफूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. देशभरात मोठ्या संख्येने तिरंग्याची विक्री झाली आहे. एवढचं नाही तर भारतीयांकडून नवनवीन मोहिम राबवत देशाचा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करताना दिसत आहे. तरी फक्त घरोघरी झेंडा फडकवूनच नाही तर ही अमृत महोत्सवा निमित्त साजरी करण्यात येत असलेली ही मोहीम तुम्ही डिजीटल (Digital) माध्यमातून देखील साजरी करु शकता. (हे ही वाचा:- Har Ghar Tiranga: Social Media च्या Profile Picture वर तिरंगा ठेवण्याचं पंतप्रधान मोदींच आवाहन, Whats App, Facebook, Instagram सह Twitter चा 'असा' बदला प्रोफाईल पिक्चर)

 

स्वतच्या सोशल मिडीया प्लॉटफॉर्मचा (Social Media Platform) प्रोफाईल पिक्चर (Profile Picture) बदलून या 13 दिवसाच्या कालवधीत तिरंगा प्रोफाईल पिक्चर म्हणून ठेवण्याचं आवहान पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी देखील त्यांच्या सोशल मीडीया प्रोफाईल पिक्चर (Profile Picture) तिरंगा ठेवला आहे. तरी घरोघरी तिरंगा लावणार आहात त्याचप्रमाणे डिजीटल माध्यमातून तुमचा प्रोफाईल फोटो तिरंगा ठेवत तुम्ही या अभियानात सहभागी होवू शकता.