PAN Aadhaar Link: 31 मार्चपर्यंत PAN कार्ड Aadhaar सोबत लिंक न केल्यास होऊ शकते 'हे' नुकसान; वाचा सविस्तर
Aadhaar-PAN Linking |(Photo Credits: File Photo)

PAN Aadhaar Link: या महिन्याच्या अखेरीस तुमचा परमनंट अकाउंट नंबर (Permanent Account Number - PAN) कार्ड तुमच्या आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक न केल्यास ते निष्क्रिय होऊ शकते. आधारशी पॅन लिंक (PAN Aadhaar Link) करण्याची नवीनतम अंतिम मुदत 31 मार्च, 2022 ही निर्धारित केली आहे. जर पॅन धारकाने त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर त्याला विविध समस्यांना सामोरे जावे लागेल.

गेल्या काही वर्षांपासून सरकार पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी सूचना देत आहे. दरम्यान, केंद्राने अनेक प्रसंगी पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. आता 31 मार्च 2022 ही नवीनतम आधार-पॅन लिंक करण्यासाठीची तारीख आहे. केंद्राकडून ही तारीख आणखी वाढवण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - LPG सिलिंडर बुकिंग प्रक्रिया झाली अधिक सोपी; आता केवळ आवाजाने बुक करता येणार Gas Cylinder)

दरम्यान, तुम्ही 31 मार्च पर्यंत आधार-पॅन लिंक न केल्यास तुम्हाला विविध दंडाला सामोरे जावे लागू शकते. तसेच तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते. याशिवाय तुम्हाला अनेक समस्यांना सामोर जावं लागेल. नवीन बँक खाते उघडणे, शेअर बाजारात गुंतवणूक करणे यासारख्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. तसेच, आयकर रिटर्न आणि व्याज भरण्यासाठी अर्ज करताना तुमचे पॅन कार्ड अनिवार्य आहे.

याशिवाय तुम्ही तुमचे पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड भविष्यातील कोणत्याही व्यवहारात सादर करता येणार नाही. तथापि, तुम्ही दंड भरून अंतिम मुदतीनंतर दोन्ही कार्ड लिंक करू शकता. जे आधार क्रमांकासाठी आणि रहिवासी म्हणून पात्र आहेत त्यांना पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, रहिवासी व्यक्ती ही अशी व्यक्ती आहे जी आधार नोंदणीसाठी अर्जाच्या तारखेच्या अगोदर एका वर्षात 182 दिवस किंवा त्याहून अधिक काळ भारतात राहते.

पॅन आधारशी लिंक न केल्यास भरावा लागेल दंड -

नियोजित तारखेपूर्वी पॅन आधारशी लिंक न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. IT कायद्याच्या कलम 234H अंतर्गत, आधारशी पॅन लिंक करण्यात अयशस्वी झाल्यास 1,000 रुपये दंड आकारला जातो. आयटी कायद्याच्या कलम 234F अंतर्गत उत्पन्नाचे रिटर्न न भरल्याबद्दल 10,000 रुपये दंड आकारला जातो.

आधारशी लिंक करण्यात अयशस्वी झाल्यास करदाते उत्पन्नाच्या बदल्यात त्यांचा पॅन क्रमांक देऊ शकणार नाहीत. इतकेच नाही तर उत्पन्नाचे विवरणपत्र उशिरा भरल्यास व्याज आकारले जाईल. तसेच, कलम 139A च्या तरतुदींचे पालन न केल्यास रु.10,000 चा दंड लागू आहे. या कलमानुसार काही आर्थिक व्यवहारांसाठी आधारशी पॅन लिंक असणे अनिवार्य आहे.