
केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांनी Employees Provident Fund Organisation कडून लवकरच "EPFO 3.0" ची घोषणा होणार असल्याची माहिती दिली आहे. या नव्या सुविधेच्या माध्यमातून नोकरदार मंडळी आणि सब्सस्क्रायबर्स त्यांच्या पीएफ अकाऊंट मधील पैसे एटीएम ने काढू शकणार आहेत. अपग्रेडेड व्हर्जन मध्ये आता अनेक नवी फीचर्स पाहता येणार आहेत. पीएफ अकाऊंटस अपडेट झाल्यानंतर आता ती बॅंकांप्रमाणे काम करू शकणार आहेत. EPFO's Telangana zonal and regional office in Hyderabad, च्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी सब्सस्क्रायबर्सना यूएएन नंबर वरून आता अगदी सहज अकाऊंट्स हाताळता येणार असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये आर्थिक व्यवहार अगदी बॅंकेप्रमाणे होणार आहेत.
EPFO 3.0 काय आहे?
EPFO 3.0 हा सरकारचा आगामी उपक्रम आहे ज्यामध्ये EPF members चा त्यांचं पीएफ अकाऊंट सांभाळताना अनुभव सुकर होणार आहे. अकाऊंट वापरण्याची प्रक्रिया सुधारणार आहे. यामध्ये काही फीचर्स देखील दिले जातील. युजर्सना त्यांच्या रिटायरमेंटच्या सेव्हिंग्स वर अधिक चांगला कंट्रोल दिला जाईल. फंड्स झटपट ट्रान्सफर करता येतील. बॅंकांमधून पेंशन झटपट काढता येईल.
EPFO 3.0 चा फायदा कसा होणार?
EPFO 3.0 मुळे एटीएममधून त्वरित पैसे काढणे सोपे होईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत हातात लवकर पैसे उपलब्ध होण्यास मदत होईल. योगदान मर्यादा काढून टाकून आणि आर्थिक सुरक्षितता वाढवून उच्च निवृत्ती बचतीची सुविधा देखील उपलब्ध होईल. याव्यतिरिक्त, अपग्रेड केलेले प्लॅटफॉर्म चांगल्या ऑनलाईन सुविधा देतील.
EPFO 3.0 लागू कधी होणार?
. सध्या हा उपक्रम अपग्रेडच्या अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये ईपीएफ ची सिस्टीम अपग्रेड होईल आणि अधिक मॉर्डन होईल. झटपट पैसे काढणे आणि जास्त योगदानाच्या पर्यायासह, ते निवृत्ती बचत व्यवस्थापित करण्याचा अधिक सोयीस्कर आणि कार्यक्षम मार्ग दिला जाणार आहे.