7th Pay Commission: भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात या महिन्यात होणार वाढ; 14 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार थेट लाभ
Money | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

7th Pay Commission: भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच भरघोस पगार मिळणार आहे. केंद्र सरकारने सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्के केला आहे. हा बदल जानेवारी 2022 पासून प्रभावी मानला जाईल. याची अंमलबजावणी करून, रेल्वे मंत्रालयाने (Rail Ministry) आपल्या सर्व झोनला कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता (DA) देण्यास सांगितले आहे. यासोबतच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची थकबाकीही भरण्यास सांगितले आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचा थेट फायदा भारतीय रेल्वेच्या 14 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. आता त्यांना एप्रिलचा पगार कधी मिळेल, यासोबतच आता त्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. एवढेच नाही तर एप्रिल महिन्याच्या पगारासोबतच जानेवारी ते मार्च महिन्याची थकबाकीही या 14 लाख लोकांना मिळणार आहे. या संदर्भात, रेल्वे बोर्डाचे (Railway Board) उपसंचालक जय कुमार (Jaya Kumar G) यांनी मंगळवारी सर्व झोन आणि उत्पादन घटकांना पत्र जारी केले. (हेही वाचा - Bank Locker Charges मध्ये वाढ; जाणून घ्या SBI ते Axis बॅंक किती रूपये आकारतात?)

रेल्वे बोर्डाच्या उपसंचालकांनी पाठवलेल्या या पत्रात आता रेल्वे कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2022 पासून मूळ वेतनाच्या 31 टक्के ऐवजी 34 टक्के दराने महागाई भत्ता देण्यात यावा, असे म्हटले आहे. उपसंचालकांनी पत्रात असेही म्हटले आहे की, मार्च 2022 च्या वेतन वितरणापूर्वी महागाई भत्त्याची थकबाकी भरता येणार नाही.

ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की, 30 एप्रिल रोजी थकबाकीसह महागाई भत्ता दिला जाईल. मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, सर्व संबंधित युनिट्सना उपसंचालकांच्या आदेशाची प्रत मिळाली आहे. या आदेशानंतर आता 31 टक्क्यांऐवजी 34 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे.