
Bank Holidays in January 2021: डिजिटल माध्यमावर अनेक प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, तरी आपल्याला चेक क्लियरेंस, सर्व प्रकारच्या कर्जाशी संबंधित सेवा व इतर विविध कामांसाठी संबंधित बँकेच्या शाखेत जावे लागते. त्यामुळे तुम्हाला बँकेच्या वर्कींग डेजबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला विनाकारण बँकेत जाऊन परत याव लागेल. कदाचित यामुळे तुम्हाला मानसिक त्रासही सहन करावा लागू शकतो. हा मानसिक त्रास कमी करायचा असेल, तर तुम्हाला पुढील महिन्यात म्हणजेचं जानेवारीत बँकेला कोणत्या दिवशी सुट्टी आहे हे जाणून घ्याव लागेल. चला तर मग जानेवारी महिन्यातील बँक हॉलिडेजच्या तारखा जाणून घेऊयात...
जानेवारी 2021 मध्ये बँकांना एकूण 16 दिवसांची सुट्टी असणार आहे. यात पाच रविवार आणि दुसर्या आणि चौथ्या शनिवारीचा समावेश आहे. जानेवारीमधील प्रत्येक रविवारशिवाय बँकांना दुसर्या आणि चौथ्या शनिवारी सार्वजनिक सुट्टी असेल. आरबीआयने 2015 मध्ये यासंदर्भात घोषणा केली होती. (हेही वाचा - Bank Holidays in Year 2021: नववर्षात किती मिळणार सुट्ट्या आणि Long Weekends; येथे पहा संपूर्ण यादी)
- 1 जानेवारी 2021:
नवीन वर्षाच्या निमित्ताने बँकांच्या मेघालय, मणिपूर, सिक्कीम, तामिळनाडू आणि मिझोरम या राज्यामध्ये सार्वजनिक सुट्टी असणार आहे.
- 2 जानेवारी, 2021:
नवीन वर्षाच्या उत्सवाच्या निमित्ताने या दिवशी बँकांना मिझोरममध्ये सार्वजनिक सुट्टी असेल.
- 3 जानेवारी 2021:
बँकांना रविवारी सार्वजनिक सुट्टी असेल.
- 9 जानेवारी 2021:
दुसर्या शनिवारी बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.
- 10 जानेवारी 2021:
बँकांना रविवारी सार्वजनिक सुट्टी असेल.
- 12 जानेवारी 2021:
पश्चिम बंगालमध्ये स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.
- 14 जानेवारी, 2021:
गुजरात, तामिळनाडू, सिक्किम आणि तेलंगणा येथे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी असेल.
- 15 जानेवारी 2021:
माघ बिहूच्या निमित्ताने बँकांना तामिळनाडू आणि आसाममध्ये सार्वजनिक सुट्टी असेल.
- 16 जानेवारी 2021:
तामिळनाडूमध्ये थिरुनालच्या निमित्ताने बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.
- 17 जानेवारी 2021:
बँकांना रविवारी सार्वजनिक सुट्टी असेल.
- 20 जानेवारी 2021:
गुरु गोविंदसिंग जयंतीनिमित्त बँकांमध्ये पंजाबमध्ये सार्वजनिक सुट्टी असेल.
- 23 जानेवारी 2021:
चौथ्या शनिवारी बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.
- 24 जानेवारी 2021:
बँकांना रविवारी सार्वजनिक सुट्टी असेल.
- 25 जानेवारी 2021:
Imoinu Iratpa च्या निमित्ताने मणिपूरमध्ये बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.
- 26 जानेवारी 2021:
प्रजासत्ताक दिनामुळे बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.
- 31 जानेवारी 2021: बँकांना रविवारी सार्वजनिक सुट्टी असेल.
अशाप्रकारे जानेवारी महिन्यात बँकांना तब्बल 16 दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँक ग्राहकांनी वरील सुट्टीच्या तारखा लक्षात ठेऊन बँकेसंदर्भातील काम पूर्ण करावेत. 2020 हे वर्ष संपण्यासाठी केवळ काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्यानंतर 2021 या नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे.