AirAsia ची नवी ऑफर; आता भारतात प्रवास करा 999 रुपयांत, तर आंतरराष्ट्रीय प्रवास फक्त 2,999 मध्ये
एअर एशिया (Photo Credits: PTI)

आजकाल वाहतुकीची साधने आणि पर्याय यांच्या विपुल उपलब्धतेमुळे जग जवळ आले आहे. असे असले तरी लोक बस आणि रेल्वे यांना प्राधान्य देताना दिसून येतात. बरेचवेळा विमानाचे तिकीट परवडत नसल्याने मनात असूनही विमानाचा प्रवास होत नाही. अशा लोकांसाठीच एअर एशिया (AirAsia) ने फार मोठी ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत भारतात तुम्ही फक्त 999 रुपयांमध्ये विमान प्रवास करू शकणार आहात. तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे दर 2,999 रुपयांपासून सुरु होत आहेत. यासाठी तुम्हाला 7 जानेवारी ते  20 जानेवारी  2019 दरम्यान विमानाचे तिकीट बुक करावे लागणार आहे. या ऑफरचा लाभ तुम्ही 21 जानेवारी ते 31 जुलै 2019 पर्यंत घेऊ शकता.

फेस्टीव्ह सेल (Festive Sale) असे या ऑफरचे नाव असून, या ऑफरसाठी तुम्हाला एअर एशियाच्या वेबसाईटवरून किंवा मोबाईल अॅप तिकिट बुक करावे लागणार आहे. आशिया आणि ऑस्ट्रेलियासह तब्बल 130 ठिकाणी लोक या ऑफरअंतर्गत प्रवास करू शकतील.

भारतातील काही महत्वाची ठिकाणे - बंगळूरू, नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, कोची, गोवा, जयपूर, चंदीगड, पुणे, गुवाहाटी, इम्फाल, विशाखापट्टणम, हैदराबाद, श्रीनगर, बागडोग्रा, रांची, भुवनेश्वर, इंदौर आणि चेन्नई.

आंतरराष्ट्रीय ठिकाणे - बॅंकॉक, सिडनी, ऑकलॅन्ड, मेलबर्न, सिंगापूर आणि बाली

एअर एशिया इंडिया, एअर एशिया बेरहाद, थाई एअर एशिया आणि एअर एशिया एक्स अशा एअर एशिया ग्रुप नेटवर्कद्वारे चालविल्या जाणाऱ्या सर्व विमानतळावर या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. याचसोबत एअरएशियाची नवी मुंबई – बंगळूरु थेट विमानसेवा 15 जानेवारी 2019 पासून सुरु होत आहे. या प्रवासाचे टिकत फक्त 1599 पासून उपलब्ध असेल.