बँकेत नोकरीची संधी; पहा कसा आणि कुठे कराल अर्ज
Image used for representational purpose. (Photo Credits: PTI)

Abhyudaya Bank Recruitment: तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. अभ्युदय बँकेत क्लर्क पदासाठी भरती सुरु झाली आहे. 20 फेब्रुवारी 2019 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करु शकता. मात्र नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला लेखी परीक्षा देणे गरजेचे आहे. कारण त्यावरुनच उमेदवारांची निवड होणार आहे. (UPSC च्या सिलेक्शन प्रक्रियेमध्ये इंटरव्ह्यू पास न झालेल्यांनाही लवकरच सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता)

वयोमर्यादा- कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 30 वर्षे

पद- 100

पगार- 32520 - 51625 /-

शैक्षणिक योग्यता:

मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी असणे अनिवार्य.

कंप्म्युटरचे ज्ञान अत्यावश्यक.

अर्जाची फी:

सामान्य/ओबीसी- 1200/-

SC/ST/NT- 600/-

डेबिट, क्रेडिट, नेट बँकिंगच्या माध्यमातून परिक्षा शुल्क तुम्ही भरु शकता.

नोकरीचे ठिकाण:

पुणे (महाराष्ट्र)

कसा कराल अर्ज?

इच्छुक उमेदवारांनी www.abhyudayabank.co.in या वेबसाईटला भेट द्या आणि तिथून नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करा.

तुम्हीही नोकरीच्या शोधात असला तर ही हातची संधी अजिबात सोडू नका. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटचे दोनच दिवस बाकी आहेत.