Aadhaar Card प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

UIDAI कडून आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update) करण्याला मुदत वाढ देण्यात आली आहे. 14 डिसेंबर पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करण्यात येणार आहे. 10 वर्षापूर्वी आधार कार्ड ज्यांनी काढले आहे आणि त्यामध्ये कोणतेही अपडेट केलेले नाहीत त्यांना आता मोफत अपडेट करण्यासाठी ही सोय देण्यात आली आहे. यामध्ये खाजगी माहिती अपडेट करता येणार आहे. त्यामध्ये नाव, फोटो, पत्ता, लिंग, जन्म तारीख, मोबाईल नंबर आणि इमेल आयडी अपडेट करता येणार आहे. या अपडेट्स साठी myaadhaar.uidai.gov.in ला भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाईट वर कोणत्याही चार्जेस शिवाय अपडेट्स करता येणार आहे.

आधार कार्ड मधील अपडेट्स हे ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील करता येणार आहेत. My Aadhaar portal वर लॉग ईन करून हे अपडेटस घरबसल्या करता येणार आहे. तर ऑफलाईन अपडेट्स साठी जवळच्या आधार केंद्रावर जाऊन अपडेट्स करता येणार आहे. ऑफलाईन मध्ये 50 रूपये शुल्क आकारले जाणार आहे. सिस्टिम ची कार्यक्षमता मजबूत ठेवण्यासाठी 10 वर्षांनी प्रत्येकाला हे अपडेट्स करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आधार कार्ड्स ऑनलाईन अपडेट कसं कराल?

  • My Aadhaar ची वेबसाईट myaadhaar.uidai.gov.in ला भेट द्या.
  • आता तुमचा आधार क्रमांक टाका. OTP साठी विनंती करा. तुमच्या रजिस्टर नंबर वर एक ओटीपी येईल.
  • तुम्ही लॉग ईन केल्यानंतर तपशील अपडेट करा. यामध्ये नाव, पत्ता, फोटो अपडेटचा पर्याय असेल.
  • आवश्यक कागदापत्र स्कॅन करून अपळोड करा.
  • 2 एमबी साईझ पर्यंतचा फोटो अपलोड करा.
  • तुमच्या बदलांसाठी रिव्ह्यू होईल. तो पूर्ण झाला की अपडेट्स होतील.
  • दरम्यान ऑनलाईन प्रक्रियेसाठी पैसे आकारले जाणार नाहीत.
  • तुम्हांला हे बदल झाले की नाहीत हे पाहण्यासाठी update request number दिला जाईल त्याच्या माध्यमातून स्टेटस ट्रॅक करू शकाल.

आधार सेंटर वर जाऊन ऑफलाईन माध्यमातून अपडेट कसं कराल?

  • जवळच्या आधार सेंटरला भेट द्या.
  • आधार सेंटर वर फॉर्म भरा. आधार नंबर देऊन तुम्ही हवा असलेल्या अपडेट्सची माहिती द्या.
  • अपडेट साठी मूळ पत्रकं पुरावा म्हणून द्या.
  • व्हेरिफिकेशन साठी त्याची फोटोकॉपी घेतली जाईल.
  • biometric authentication (fingerprints, iris scan)केली जाईल.
  • 50 रूपये शुल्क आकारले जाईल.
  • आता तुम्हांला acknowledgement slip दिली जाईल ज्यामध्ये ट्रॅकिंग साठी reference number दिला जाईल.

तुमच्या ओळख माहितीची अचूकता आणि अखंडता सुनिश्चित करण्यासाठी तुमचे आधार तपशील अपडेट करणे आवश्यक आहेत. आधार कार्ड हे विविध सरकारी सेवा आणि फायदे मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे. तुम्ही अधिकृत पोर्टलद्वारे तुमचे आधार ऑनलाइन अपडेट करणे निवडा किंवा ऑफलाइन प्रक्रियेसाठी आधार केंद्राला भेट द्या, ही प्रक्रिया सोपी आणि सोयीस्कर करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. UIDAI ने मोफत अपडेटची अंतिम मुदत 14 डिसेंबरपर्यंत वाढवल्यामुळे, तुमचे आधार तपशील अपडेट करण्याची हीच योग्य वेळ आहे.