Inflation | (Photo Credits: ANI)

CPI Inflation: किरकोळ चलनवाढीचा दर (Retail Inflation Rate जूनमध्ये 5.08% पर्यंत वाढला आहे, जो गेल्या महिन्यात मे मधील 4.80% वरून वार्षिक आधारावर 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स (All India Consumer Price Index CPI) क्रमांकावर आधारित वार्षिक चलनवाढीचा दर जून, 2024 साठी 5.08% आहे. ग्रामीण आणि शहरींसाठी संबंधित महागाई दर अनुक्रमे 5.66% आणि 4.39% आहे. यासंदर्भात सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून आकडेवारी जारी करण्यात आली आहे.

दरम्यान, अन्नधान्य महागाई जूनमध्ये 9.55% पर्यंत वाढली. ग्रामीण चलनवाढ मे मधील 5.34% आणि जून 2023 मध्ये 4.78% वरून जूनमध्ये 5.67% वर गेली. याउलट, शहरी चलनवाढ जून 2023 मध्ये 4.21% आणि जून 2023 मध्ये 4.96% वरून जूनमध्ये 4.39% पर्यंत कमी झाली. (India’s Retail Inflation Data: डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 5.69 टक्के; चार महिन्यांतील उच्चांकावर)

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारताचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) एप्रिलमधील 5% च्या तुलनेत मे महिन्यात 5.9% वाढला. (Inflation In India: भारतातील महागाई दर 2023 मध्ये 5% राहील, 2024 मध्ये घसरुन 4% होण्याची शक्यता-आंतरराष्ट्रीय नाणेनिधी)

महिंद्रा बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ उपासना भारद्वाज यांनी सांगितले की, सीपीआय महागाई आमच्या अपेक्षेपेक्षा किरकोळ जास्त आहे. अन्नधान्य चलनवाढीचे धोके नजीकच्या काळात कायम राहणार असले तरी, पेरणीचे चांगले स्वरूप आणि पावसाचे स्थानिक वितरण यामुळे या अस्थिर महिन्यांच्या पलीकडे किंमतीचा दबाव कमी होईल अशी आमची अपेक्षा आहे.