India’s Retail Inflation in December: खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे किरकोळ महागाईचा दर गेल्या महिन्यात 5.69 टक्क्यांसह चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. डिसेंबर महिन्याची किरकोळ महागाईची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या महिन्यात किरकोळ महागाई दर 5.69 टक्के होता, तर नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई 5.55 टक्के होती. यासह डिसेंबर अन्नधान्य महागाई दर 9.53 टक्के होता, जो नोव्हेंबरमध्ये 8.70 टक्के होता. ग्रामीण भागातील महागाई 5.93 टक्के होती जी नोव्हेंबरमध्ये 5.85 टक्के होती. शहरी महागाई 5.46 टक्के होती, जी नोव्हेंबरमध्ये 5.26 टक्के होती. कंझ्युमर प्राइस इंडेक्स (CPI) वर आधारित महागाई नोव्हेंबर 2023 मध्ये 5.55 टक्के आणि डिसेंबर 2022 मध्ये 5.72 टक्के होती. (हेही वाचा: India's First Bullet Train: देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार; रेल्वेमंत्री Ashwini Vaishnaw यांची माहिती)
India’s retail inflation 5.69% in December 2023, says Ministry of Statistics. pic.twitter.com/4up39fS63P
— ANI (@ANI) January 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)