प्रियकराच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीने आपल्याच आई- वडिलांची हत्या (Double Murder) केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदूर (Indore) येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी दोघांनाही रतलाम येथून अटक करण्यात आली आहे. हे दोघेही दुचाकीवरून राजस्थानला पळण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. हत्येचा केल्यानंतर आरोपी मुलीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांना तिच्यावर संशय आल्याने याप्रकरणी अधिक चौकशी केली. यातून तिनेच आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याची कबूली दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगी ही 17 वर्षाची असून ती अकरावीत शिकत आहे. तर, धनंजय उर्फ डिजे असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. आरोपींनी आई-वडिलांच्या हत्येचा कट आधीच रचला होता. यानुसार, तिने सकाळी धनंजयला आपल्या घरी बोलावून घेतले. त्यानंतर ती स्वतः घराबाहेर फिरायला गेली. त्यादिवशी धनंजयने आधी तिच्या आईची हत्या केली. त्यानंतर तिच्या वडिलांचीही हत्या केली. हत्येच्या घटनेनंतर आरोपी मुलगी बेपत्ता झाली होती. त्यावेळी पोलिसांना त्यांच्या घरात एक चिठ्ठी मिळाली होती. त्या चिठ्ठीत तिने आपल्या वडिलांवर अत्याचाराचे आरोप केले होते आणि आई त्यांना साथ देत होती. या त्रासाला वैतागून घर सोडून जात असल्याचे तिने चिठ्ठीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपींजवळील काही कपडे आणि 1 लाख रुपये जप्त केले आहेत. हे देखील वाचा- Uttar Pradesh: कानपूर मधील 3 वर्षांच्या मुलाचा बापानेच घेतला जीव; कारण वाचून व्हाल हैराण
तत्पूर्वी गुरुवारी इंदूरच्या एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुक्मिणी नगरात पती-पत्नीची हत्या झाली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. ज्योतिप्रसाद शर्मा आणि नीलम असे हत्या झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. ज्योतिप्रसाद मध्य प्रदेशच्या एसएएफमध्ये कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होते.