Indonesia Floods: इंडोनेशियाच्या उत्तर सुमात्रा (Sumatra)प्रांतात भूस्खलन आणि अचानक (Indonesia Landslide) आलेल्या पुरामुळे 13 जणांचा मृत्यू झाला. तर, 18 जण जखमी झाले, असे तेथील आपत्ती व्यवस्थापन आणि शमन एजन्सींच्या माहितीवरून समोर आले आहे. एजन्सीच्या आपत्कालीन, उपकरणे आणि लॉजिस्टिक युनिटचे प्रमुख श्री वाहुनी पंचशिलावती यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री डेली सरडांग आणि करो भागात भूस्खलन झाले.
पुरात डेली सेरडांगयेथील घरे आणि धार्मिक स्थळे वाहून गेली. या घटनेत तेथे सहा जणांचा मृत्यू झाला. नऊ जण जखमी झाले. करो रीजेंसीमध्ये याच घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. (Flood in Spain: स्पेनमध्ये अचानक आलेल्या पुरात किमान 51 जणांचा मृत्यू; रेल्वे सेवा विस्कळीत, वाहनेही गेली वाहून (Watch Video))
शनिवारी सकाळी, भूस्खलन आणि पूर परिस्थितीमुळे पाडांग लावास आणि दक्षिण तपनुली रिजन्सीमध्ये सहा ठार आणि सात जखमी झाले. इंडोनेशियात अजूनही हवामानशास्त्र एजन्सींच्या अंदाजानुसार सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. आपत्ती व्यवस्थीपन कक्ष परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी व्हॅलेन्सियाच्या पूर्वेकडील स्पॅनिश प्रदेशात अचानक आलेल्या पुरात 51 जणांचा मृत्यू झाला होता. या पावसामुळे रस्ते आणि शहरे पाण्याखाली गेली होती. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओंमध्ये पुराच्या पाण्यात लोक अडकलेले दिसत होते. काही जण वाहून जाऊ नये यासाठी झाडांवर चढले होते. तेथे ट्यूरिस आणि युटिएलमध्ये 200 मिमी पावसाची नोंद झाली होती.