Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

इंडिगोने (IndiGo) मंगळवारी एका भन्नाट तीन दिवसीय उन्हाळी ऑफरची घोषणा केली. यामध्ये 14 ते 16 मे पर्यंत तिकीट बुक केल्यास देशांतर्गत प्रवासाचे तिकीट 999 रुपयांपासून सुरु होणार आहे, तर आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाचे तिकीट 3499 रुपयांनी सुरू होणार आहे. प्रवासी यादरम्यान बुक केलेल्या तिकिटांवर 29 मे ते 28 सप्टेंबर पर्यंत प्रवास करू शकतील. 16 मे रात्री 12 वाजेपर्यंत हा सेल सुरु असणार आहे. या ऑफरद्वारे तब्बल 10 लाख सीट्सचे लक्ष्य टारगेट करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. सध्या इंडिगोची दररोज 1,400 उड्डाण होतात, यामध्ये 53 राष्ट्रीय आणि 17 आंतरराष्ट्रीय ठिकाणे कव्हर केली जातात.

या ऑफर अंतर्गत असणाऱ्या तिकिटांचे दर - दिल्ली-बेंगळूरू 2,799, दिल्ली-भुवनेश्वर 2,499, दिल्ली-चेन्नई 3,099, दिल्ली-गुवाहाटी 2,599, दिल्ली-हैदराबाद 2,500, दिल्ली-कोलकाता 2,899, दिल्ली-मुंबई 2,499 आणि दिल्ली-पुणे 2,599, तर दिल्ली-अहमदाबाद विनचे तिकीट 1,899 पासून सुरु होईल.

भारताबाहेर, हैदराबाद-दुबई, चेन्नई-कुवैत, दिल्ली-क्वालालंपुर आणि बेंगलुरू-माले (मालदीव) या मार्गांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाचे तिकीट 3499 रुपयांपासून उपलब्ध असेल.

या ऑफरद्वारे इंडिगो प्रीपेड अतिरिक्त सामान आणि प्रीपेड एक्सप्रेस चेक-इन सेवेवर 30% पर्यंत आकर्षक सवलत देत आहे. इंडिगो वेबसाइट आणि मोबाइल ऍप्लिकेशनद्वारे ग्राहक तिकिटे बुक करू शकतात. तसेच मोबिक्वीक वॉलेट आणि डिजीबँक डेबिट कार्डद्वारे बुकिंग केल्यास अतिरिक्त कॅशबॅक प्राप्त करू शकतात.