Isolation coaches (PC- ANI)

Coronavirus: भारतीय रेल्वेत (Indian Railways) 20 हजार आयसोलेशन कोच (Isolation Coaches) तयार करण्यात आले आहेत. या कोचमध्ये जवळपास 3 लाख 2 हजार बेडची सुविधा करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस विरोधातील लढ्यात भारतीय रेल्वेने मोठं योगदान दिलं आहे. संपूर्ण देशातील पाच विभागामध्ये रेल्वेने कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी आयलेशन कोच तयार केले आहेत.

या कोचमध्ये रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी रेल्वेतील कोचमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. प्रत्येक कोचमध्ये रुग्णांसाठी आंघोळीची तसेच टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या आजाराचा सामना करण्यासाठी आता भारतीय रेल्वे पुढे आली आहे. भारतीय रेल्वेने आपल्या काही गाड्यांमध्ये विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी देशातील रुग्णालय कमी पडल्यास रेल्वेच्या या आयसोलेशन कक्षांमध्ये रुग्णांना दाखल करता येणार आहे. यासाठी रेल्वे गाड्यांच्या कोचेसमध्ये काही तात्पुरते बदल करण्यात आले आहे. (हेही वाचा - Coronavirus: दिल्लीतील ‘त्या’ धार्मिक कार्यक्रमात देश-विदेशातील 1500 हून अधिक लोक सामील; 24 जणांना कोरोनाची लागण, देशात भीतीचे वातावरण)

कोरोना विरोधातील लढ्यासाठी रेल्वेतील 13 लाख कर्मचाऱ्यांनी 151 कोटी रुपये पीएम केअर फंडला दान केले आहेत. तसेच रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनीदेखील आपले वेतन कोरोनाग्रस्तांसाठी दिले आहे. याशिवाय देशात लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तू तसेच वैद्यकिय उपकरणांचा पुरवठा करण्यासाठी काही विशेष पार्सल रेल्वे गाड्या चालवण्यात येत आहेत.