Covid-19 Vaccine in Capsule: कोरोना लस नव्हे, तर आता कॅप्सूलनेही करता येणार कोविड-19 चे निर्मूलन
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Covid-19 Vaccine in Capsule: जगभरात कोरोना विषाणूच्या निर्मूलनासाठी अनेक लसी सादर केल्या गेल्या आहेत. बहुतेक देशांमध्ये लसीकरण देखील सुरू झाले आहे. तथापि, आता ते दिवस दूर नाही, जेव्हा आपल्याला लस घेण्याऐवजी फक्त एक कॅप्सूल खावी लागेल. जगातील बर्‍याच फार्मा कंपन्यांनी कोरोना लस बनविली आहे. आता भारताची फार्मा कंपनी प्रेमास बायोटेक (Premas Biotech) ने आता कोरोनाच्या उपचारांसाठी कॅप्सूलची लस तयार केली आहे.

भारतीय औषधी कंपनी प्रेमास बायोटेक आणि अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी ओरमेड फार्मास्युटिकल्स (American Company Oramed Pharmaceuticals Inc) मिळून ही कॅप्सूल लस विकसित करीत आहे. या दोन्ही कंपन्यांनी 19 मार्च रोजी कोरोना विषाणूची ओरल वॅक्सीन बनवणार असल्याची घोषणा केली होती. तोंडी लसीच्या घोषणेबरोबरचं कंपनीने असा दावा केला आहे की, या कॅप्सुलचा केवळ एक डोस कोरोनापासून आराम देईल. (वाचा - युरोप आणि इंडोनेशियामध्ये AstraZeneca लस वापरण्यास परवानगी, तर फिनलँडने लावले प्रतिबंध)

इंडिया टुडेच्या अहवालानुसार, कंपनीने कॅप्सूलचे नाव ओव्हरव्हॅक्स असे दिले असून असा दावा केला आहे की, ही कॅप्सूल लस प्राण्यांवर बर्‍यापैकी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, कॅप्सूल दिल्यानंतर ट्रीलाइजिंग अँटीबॉडीज आणि रोगप्रतिकारक प्रतिक्रिया दोन्ही योग्यरित्या कार्य करत आहेत.

दरम्यान, प्रेमास बायोटेक ही एक भारतीय कंपनी आहे. प्रबुद्ध कुंडू हे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक आहेत. कंपनीचा कॅप्सूल व्हॅक्सीन व्हीएलपी (व्हायरस लाइक पार्टिकल) नियमावर आधारित आहे. कंपनीने हे तंत्रज्ञान आपल्या डी-क्रिप्ट टीएम प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. भारत बायोटेक विस्कॉन्सिन विद्यापीठातसह नोजल लस तयार करण्यासाठी कार्य करत आहे. नोजल लसची क्लिनिकल चाचणीही सुरू आहे.