American Airlines Passenger Urinating Case: अमेरिकन एअरलाइन्सच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये भारतीय व्यक्तीने सहप्रवाशावर केली लघवी; आरोपीला अटक
Flight | (PC- Pixabay.com)

American Airlines Passenger Urinating Case: न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये (New York-Delhi Flight) सहप्रवाशाने लघवी केल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी एका भारतीय नागरिकाला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI Airport Delhi) अटक करण्यात आली आहे. अमेरिकन एअरलाइन्सच्या (American Airlines) फ्लाइटमध्ये न्यूयॉर्क ते दिल्ली प्रवास करताना एका भारतीय नागरिकाने सहप्रवाशावर लघवी (Urine) केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट AA 292 मध्ये ही घटना घडली. रविवारी रात्री 9 वाजता दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरताच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) आरोपीला पकडले. एअरलाइन्स कर्मचाऱ्यांनी सांगितले की, भारतीय नागरिक असलेला आरोपी दारूच्या नशेत होता. सहप्रवाशासोबत झालेल्या वादानंतर त्याने सहप्रवाशावर लघवी केली. (हेही वाचा -Air India Passenger Urinating Case: फ्लाइटमध्ये लघवी घटनेप्रकरणी एअर इंडियावर कारवाई, DGCA ने 30 लाखांचा दंड ठोठावला)

विमान कंपनीने विमान येण्यापूर्वी दिल्ली विमानतळाला या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही प्रवाशांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पीडित प्रवाशाने फिर्याद दिली आहे. मद्यप्राशन करून सहप्रवाशाने लघवी केल्याची प्रकरणे गेल्या काही दिवसांत अनेकदा समोर आली आहेत. गेल्या वर्षी 26 नोव्हेंबर 2022 रोजी एका पुरुष प्रवाशाने विमानात एका महिला सहप्रवाशावर लघवी केली होती. हे दोघेही न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत होते.

यानंतर असेच आणखी एक प्रकरण समोर आले होते. 6 डिसेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये पॅरिसहून दिल्लीला येत असताना एका प्रवाशाने रिकाम्या सीटवर आणि महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली होती. आरोपीने लघवी केली तेव्हा महिला वॉशरूममध्ये गेली होती.