India Pakistan Tension: अमेरिकेने लादेनला मारले तर आता काहीही होऊ शकते,पाकिस्तानने खबरदारी घ्यावी- अरुण जेटली
India Pakistan Tension: अमेरिकेने लादेनला मारले तर आता काहीही होऊ शकते ,पाकिस्तानने खबरदारी घ्यावी- अरुण जेटली(Photo Credits-ANI)

India Pakistan Tension:  भारत आणि पाकिस्तान मधील सध्याची तणावाची स्थिती पाहता दिल्ली (Delhi) येथे संरक्षण मंत्र्यांची बैठक सुरु झाली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या घरी ही तातडीने बैठक आज बुधवारी (27 फेब्रुवारी) बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर कसे द्यायचे याबाबत चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांनी असे म्हटले आहे की, जर अमेरिका (America) पाकिस्तानात (Pakistan) घुसुन अलकायदाचा मुख्य ओसामा लादेन (Osama bin Laden) याचा खात्मा करु शकतो तर आता काहीही संभव असल्याचे विधान त्यांनी यावेळी केले आहे. त्यामुळे जेटली यांनी केलेल्या विधानाचे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु असे मानले जात आहे की, भारत ही पाकिस्तान मध्ये घुसुन मोठ्या स्तरावर जैशच्या दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करणार आहे.(हेही वाचा-युद्ध? पाकला एकदा नव्हे, हजार वेळा विचार करावा लागेल; लष्करी सामर्थ्यात भारत जगात चौथ्या क्रमांकावर, पाहा ताकद)

या दोन देशातील परिस्थिती पाहता भारतीय वायुसेनेने राज्यातील विविध ठिकाणी हाय अलर्ट जाहीर केले आहे.तसेच विमानांची उड्डाणे पुढील 3 तास थांबवण्यात आली असल्याचे ही सांगितले जात आहे.