HandInHand2018 : भारताच्या सीमेवर एकीकडे पाकिस्तान तर दुसरीकडे चीन, अशा दोन्ही बाजूंनी सतत आक्रमण होत असते. आपापल्या कुटुंबापासून दूर असलेले आपले जवान कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता, सीमेवर आपले रक्षण करत असतात. याच परिस्थितीत भारत-चीन सीमेवर डोकलाम येथे गेले कित्येक महिने सुरक्षेवरून वाद चालू आहे. चीनच्या सैन्याने भारतीय सैन्यदलाची एक लहान चौकी उद्ध्वस्त केल्यानंतर भारत आणि चीनमधील धुसमुस वाढू लागली. मात्र आता याबाबतील काळजाला भिडणारी एक गोष्ट घडली आहे. भारत आणि चीनच्या सैन्याने संयुक्त युद्धाभ्यासादरम्यान पंजाबी गाण्यावर चक्क भांगडा केला, तोही एकत्र हातात हात घालून. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
लष्कराने आपल्या ट्वीटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘Bole So Nihal Sat Sri Akal’ असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
Ex #HandInHand2018. 'Bole So Nihal Sat Sri Akal'. Troops of #IndianArmy & #ChineseArmy sharing lighter moments after practicing gruesome Battle Obstacle Course. #Synergy #Interoperability #UnitedNations @SpokespersonMoD @PIB_India pic.twitter.com/A3saAO4T8P
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) December 12, 2018
तर दोन्हे देशांच्या सैन्याचा वार्षिक सैन्य अभ्यास ‘हँड इन हँड’ चीनच्या चेंगडू येथे 10 डिसेंबरपासून सुरू झाला आहे, हा आभ्यास 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यादरम्यान या दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकत्र येऊन काही आनंदाचे क्षण एकत्र व्यतीत केले. या सैनिकांनी एकत्र नृत्यच नाही तर, एकत्र फुटबॉलचा सामनादेखील खेळला.
काय आहे डोकलाम मुद्दा ?
भारत, चीन आणि भूतान या तीन देशांची सीमारेषा डोकलाम या भागातून जाते. चीनने या डोकलाम भागात रस्ता बांधायचे काम सुरु केले. याला 16 जून 2017 मध्ये भारताने विरोध केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनच्या सैन्याने भारतीय सैन्यदलाची एक लहान चौकी उद्ध्वस्त केली. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली. शेवटी दोन्ही देशांतील वाटाघाटींना अंतिम स्वरून येईपर्यंत दोन्ही देशांकडून त्यांच्या सीमाक्षेत्रात शांतता राखली जाईल, असा लिखित करार करण्यात आलेला आहे.