Keral Crime News: चेंगणूर जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नीच्या प्रियकरावर झाडली गोळी, वाचा नेमकं प्रकरण काय ?
Gun | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

प्रेमातून (Love) गुन्हे (Crime) घडल्याच्या अनेक घटना समोर येतात. यामुळे अनेकांचे जीवही गेले आहेत. अशा प्रकारचे गुन्हे आता वाढत चालले आहेत. देशात रोज असे अनेक गुन्ह्यांची नोंद होते. याप्रकरणी काही गुन्हेगार पकडले जातात तर काही फरार होतात. दरम्यान केरळमधील (Keral) अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्ती आपल्या पत्नीच्या प्रियकरावर गोळी झाडली आहे. केरळमधील (Keral) चेंगणूर (Chengnur) जवळ असलेल्या मुंडनकावु येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रियकराच्या गुप्तांगांवर गोळी झाडून जखमी केल्याची घटना घडली आहे. त्याला तिरुवल्ला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी या घटनेची माहिती दिली असता चेंगनुर पोलिसांना शनिवारी ही घटना घडल्याचे समजले.

कोट्टयममधील वडावथूर येथे एक व्यक्ती पत्नीसह मुंडनकावु येथे राहत होता.  घटस्फोटासाठी दोघांनी परस्पर याचिका दाखल केली होती. परंतु नवरा शनिवारी मुंडनकावू येथे आला. तेथे त्याने पत्नीच्या प्रियकराच्या गुप्तांगांवर एअर पिस्तूलने गोळी झाडली. काही मिनिटांनंतर प्रेयसीने तिरुवल्ला येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाकडे संपर्क साधला. त्याला रुग्णालयात भरती केले.

प्रियकर किरकोळ जखमी असल्याने तो घरी परतला. परंतु काही तासांनंतर जननेंद्रियामध्ये तीव्र वेदना झाल्याने त्याच रुग्णालयात परत आला. असे एका अधिकाऱ्यांने सांगितले. या घटनेची कोणतीही लेखी तक्रार मिळाली नसल्याने कोणताही गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अशा अनेक घटना याआधीही समोर आल्या आहेत, अनेक वेळा यातून मोठे गुन्हे घडले आहेत.