बिहारमधील (Bihar) मुझफ्फरपूरमधून (Muzaffarpur) एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका कलियुगी मुलाने आपल्या आईवडिलांना गॅस सिलिंडरने मारहाण करून ठार (Murder) केले आहे. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. अवघ्या 50 हजारांसाठी मुलाने आई-वडिलांची हत्या केली. ही घटना घडत असताना आरोपीला त्याच्या लहान भावाच्या पत्नीने पाहिले. तेव्हा तो तिलाही मारण्यासाठी वेड्यासारखा धावला, मात्र महिलेने घरातून पळून आपला जीव वाचवला. त्याचवेळी आरोपी अजय सुमारे दोन तास मृतदेहाजवळ बसून होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुटाही गावात राहणाऱ्या अजय साहनी याने काल रात्री झोपलेले वडील शंभू साहनी आणि आई शारदा देवी या दोघांचीही डोक्यात लहान गॅस सिलिंडरने वार करून हत्या केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी अजय फेब्रुवारी महिन्यात दिल्लीहून गावात आला होता. तेव्हापासून तो अनेकदा आई-वडिलांकडे पैशांची मागणी करत असे. गेल्या अनेक दिवसांपासून तो 20 हजारांची मागणी करत होता. शनिवारी सकाळीही त्याने पुन्हा पैशांची मागणी केली. ज्याला त्याच्या पालकांनी नकार दिला. त्यानंतर दोन हजार रुपये न मिळाल्याने अजयने आई-वडिलांची निर्घृण हत्या केली. आरोपी अजय हा मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे सांगण्यात येत आहे. हेही वाचा Crime: प्रपोजला नकार दिल्याने तरुणाने गाठले मुलीचे घर, बचाव करण्याच्या नादात तरुणीने मारली पहिल्या मजल्यावरून उडी
तो नेहमी आई-वडिलांशी भांडत असे आणि संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत असे, असे स्थानिकांनी सांगितले. आरोपीला आई-वडिलांची सर्व मालमत्ता विकून पैसे द्यायचे होते. मात्र कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. याचा राग आल्याने त्याने आई-वडिलांची हत्या केली. पोलिसांनी अजयला ताब्यात घेतल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश शर्मा यांनी सांगितले. हत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सरायणचे पोलीस उपअधीक्षक राजेश शर्मा यांनी शनिवारी सांगितले की, आरोपी अजय साहनी याला अटक करण्यात आली आहे. हत्येचे कारण लगेच कळू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. अजय साहनी याने काल रात्री झोपलेले वडील शंभू साहनी आणि आई शारदा देवी या दोघांचाही डोक्यात लहान गॅस सिलिंडरने वार करून खून केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवला आहे.