Andhra Pradesh Shocker: आंध्र प्रदेशात 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, धमकी देत पालकांकडून मागितली खंडणी
(Photo credit: archived, edited, representative image)

Andhra Pradesh Shocker:  आंध्र प्रदेशातील एलुरु जिल्ह्यात एका सरकारी शाळेच्या परिसरात १३ वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी बुधवारी 15 वर्षीय आरोपीसह  इतर चार जणांना अटक केले आहे. धक्कादायक म्हणजे बलात्कार केल्यानंतर  पीडितेच्या पालकांकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्याने आरोपींनी मुलीचा बलात्काराचा व्हिडिओ व्हॉटअॅप्सवर प्रसारित केला होता तेव्हा ही घटना उघडकीस आली. या घटनेनं संपुर्ण शहर हादरले आहे. (हेही वाचा- भरधाव दुचाकीवर अश्लिल कृत्य, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांकडून कारवाई)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या पालकांना ब्लॅकमेल करण्यासाठी आरोपींनी व्हिडिओ शुट केला होता. पालकांनी खंडणी न दिल्यामुळे आरोपींनी मुलीचा अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. पीडित मुलगी 15 मे रोजी सातवीचा निकाल घेण्यासाठी मांडवली परिसराती शाळेत गेली होती. त्यावेळीस ही घटना घडली.

पीडित मुलगी बुधवारी सातवीचा निकाल घेण्यासाठी गेली होती. पीडित मुलीला कामानिमित्त दहावीच्या विद्यार्थ्यांनी आणि चार जणांनी एका रिकाम्या वर्गात ओढून नेले. वर्गात वेळ साधून पीडित मुलीवर बलात्कार केला आणि चार जणांनी तिचा व्हिडिओ फोनमध्ये शुट केला. त्यानंतर घटनास्थळावरून सर्व जण फरार झाले. व्हिडिओच्या मदतीने आरोपींनी मुलीच्या पालकांना धमकी देत खंडणी मागितली.

पीडितेच्या पालकांकडून दोन लाख रुपये मागितली. परंतु त्यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात मुलीचा व्हिडिओ व्हॉटअॅप्सवर अपलोड केला. ही माहिती मिळताच, पीडितेच्या पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या आणि पालकांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला. तक्रारीच्या काही तासांत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपींवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवले तर इतर आरोपींना कारागृहात ठेवले आहे.