IIT-Guwahati च्या विद्यार्थ्याने व्यक्त केली ISIS सामील होण्याची इच्छा; आसाम पोलिसांनी केली अटक, काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर 
Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

IIT-Guwahati Student Wish to Join Islamic State: आयआयटी-गुवाहाटीच्या एका विद्यार्थ्याने (IIT-Guwahati student) ISIS मध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर या विद्यार्थ्याला आसाममधील हाजो येथे ताब्यात घेण्यात आले आहे. हा विद्यार्थी बायोटेक्नॉलॉजीच्या चौथ्या वर्षा शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्याच्या खोलीत दहशतवादी संघटनेचा काळा झेंडा सापडला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्राप्त माहितीनुसार, या विद्यार्थ्याने सोशल मीडिया आणि ईमेलमध्ये दावा केला होता की, आपली इच्छा दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्याची आहे. या पोस्टनंतर हा विद्यार्थी त्याच्या आयआयटी गुवाहाटीच्या कॅम्पसमधून बेपत्ता झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीस्थित विद्यार्थ्याने लिंक्डइनवर एक खुले पत्र लिहून त्याच्या निर्णयाची कारणे स्पष्ट केली होती, त्यानंतर त्याच्याविरुद्ध लुकआउट अलर्ट जारी करण्यात आला होता. त्याचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, गुवाहाटीपासून 30 किमी अंतरावर असलेल्या कामरूप जिल्ह्यातील हाजो येथे त्याला पकडण्यात आले. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. (हेही वाचा - Moscow Concert Hall Attack: इस्लामिक स्टेटने स्वीकारली मॉस्कोच्या कॉन्सर्ट हॉलवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी; आतापर्तंत 60 जणांचा मृत्यू, 145 जखमी)

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, विद्यार्थ्याबाबत आयआयटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी शनिवारी दुपारपासून विद्यार्थी बेपत्ता असल्याची माहिती दिली. त्याचा मोबाईलही बंद होता. 'आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे, ज्याने आयएसआयएसशी निष्ठा व्यक्त केली आहे. पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिस महासंचालक जीपी सिंग यांनी ट्विटरवर पोस्ट करताना म्हटलं आहे. (हेही वाचा - Moscow Terror Attack: मॉस्को दहशतवादी हल्ल्यात पोलिसांना मोठे यश, दोन संशयित ताब्यात, दोघे पळून जाण्यात यशस्वी)

याशिवाय अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एसटीएफ) कल्याण कुमार पाठक यांनी सांगितले की, ईमेल मिळाल्यानंतर आम्ही त्याची चौकशी केली. हा ईमेल विद्यार्थ्यानेच पाठवला होता. यामध्ये विद्यार्थ्याने दावा केला होता की तो ISIS मध्ये सामील होणार होता. ताब्यात घेतल्यानंतर विद्यार्थ्याला त्याच्या वसतिगृहात नेण्यात आले. त्याच्या खोलीतून ISIS च्या झेंड्यासारखा काळा ध्वज आणि इस्लामिक लिपी जप्त करण्यात आली आहे.