मॉस्को दहशतवादी हल्ल्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी पाठलाग करून पळून गेलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दोन संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. रशियाची राजधानी मॉस्को येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 60 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 145 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
ISIने घेतली हल्ल्याची जबाबदारी!
हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने अमाक वृत्तसंस्थेवर एक निवेदन पोस्ट करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. निवेदनात, आयएसआयने म्हटले आहे की त्यांनी रशियाची राजधानी मॉस्कोच्या बाहेरील क्रॅस्नोगोर्स्क शहरात ख्रिश्चनांच्या मोठ्या मेळाव्यावर हल्ला केला, ज्यात मोठ्या संख्येने लोक मारले गेले आणि शेकडो जखमी झाले.
पाहा पोस्ट -
BREAKING: 2 suspects in Moscow attack in custody after police chase near Bryansk, 2 others escaped, lawmaker says pic.twitter.com/EqWg568gGM
— BNO News (@BNONews) March 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)