मॉस्को येथील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये सुुर असलेल्या मैफिलीत तीन अज्ञात बंदुखधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू आणि अनेक जण गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर या हॉलच्या इमारतीलाही आग लागल्याचे वृत्त आहे. रशियाच्या राज्य आरआयए न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तात सांगितले की, 22 मार्च रोजी घडलेल्याया घटनेत आगोदर गोळीबार झाला आणि त्यानंतर इमारतीच्या आत आग लागली. या हल्ल्यात दोन ते पाच जणांचा सहभाग होता, अशी प्राथमिक माहिती इंटरफॅक्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.
रशियन सोशल मीडिया चॅनेलवर प्रकाशित झालेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये मैफिलीतील उपस्थित लोक मोठ्या संख्येने हॉलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. त्याच वेळी मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु असून बंदूकीतून गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू येत होता. इतर व्हिडिओ फुटेजमध्ये सभागृहाबाहेर रक्ताच्या थारोळ्यात मृत पडलेले लोक दिसत होते. TASS राज्य वृत्तसंस्थेने ज्या इमारतीत गोळीबार झाला तेथे स्फोट आणि आग लागल्याचे वृत्त दिले. कॉमरसंट वृत्तपत्राने बाहेर चित्रित केलेले फुटेज पोस्ट केले आहे ज्यामध्ये मैफिलीच्या ठिकाणाची इमारत असल्याचे सांगितले गेलेल्या धुराचे मोठे ढग दिसत आहेत.
व्हिडिओ
BREAKING - Multiple fatalities reported after shooting in a Moscow concert hall in Russia, concert hall reportedly on fire
— Insider Paper (@TheInsiderPaper) March 22, 2024
एक्स पोस्ट
BREAKING: Heavy gunfire and explosions heard at the Corcus City Hall concert venue located on the outskirts of Moscow, Russia. Injuries and fatalities reported. pic.twitter.com/nXa13TxJyu
— UA News (@UrgentAlertNews) March 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)