Supreme Court On AIBE Cut-Off: ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE) साठी कमी कट ऑफची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालया (Supreme Court) ने फेटाळून लावली. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Chief Justice DY Chandrachud) यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, कट ऑफ (Cut-Off) कमी केल्याने भारतात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांच्या गुणवत्तेवर परिणाम होईल. तसेच यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले आणि म्हणाले, 'वकील व्हायचे असेल तर अभ्यास करा.'
याचिकेत काय मागणी केली होती?
अखिल भारतीय बार परीक्षेतील पात्रता गुण कमी करावेत, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेत म्हटले आहे की परीक्षेतील पात्रता गुण सामान्य श्रेणी/ओबीसीसाठी 40% आणि SC/ST उमेदवारांसाठी 35% असावेत. सध्या आवश्यक गुण 45% आणि 40% आहेत. (हेही वाचा - Save From Dog: कुत्र्यांपासून वाचवा हो! कोल्हापूरच्या जनतेचे CJI DY Chandrachud यांना पत्र)
काय म्हणाले सीजेआय चंद्रचूड?
अखिल भारतीय बार परीक्षेतील पात्रता गुण कमी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याचिका फेटाळून लावताना सांगितले की, 'तुम्ही इतकेही स्कोर करू शकत नाही पण तुम्हाला वकील व्हायचे आहे? अभ्यास करा.' (हेही वाचा - Political Pressure on Indian Judiciary : 'राजकीय गटाकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न', 600 वकिलांचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र)
दरम्यान, NEET परीक्षेसंदर्भातील एकूण 38 याचिकांवर सोमवारी, 8 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यातील पाच याचिका विविध राज्यांतील उच्च न्यायालयांमधून सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात आल्या आहेत. यातील अनेक याचिकांमध्ये परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने NEET पेपर लीकच्या सुनावणीसाठी गुरुवार, 11 जुलै रोजी पुढील तारीख ठेवली आहे.