Indian Railways Rule: रेल्वेचा प्रवाशांना इशारा! ट्रेनमध्ये प्रवास करताना 'या' चूका केल्यास होणार जेल; भरावा लागेल मोठा दंड
Indian Railway (Photo Credits-PTI)

Indian Railways Rule: भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. प्रवाशांसाठी अधिकृत अधिसूचना जारी करताना प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात रेल्वेने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. रेल्वेने ट्विट केले आहे की, ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांनी कोणताही ज्वलनशील पदार्थ घेऊन जाऊ नये. हा दंडनीय गुन्हा आहे. असे करताना एखादा प्रवासी पकडला गेल्यास त्याला कायदेशीर कारवाईसह तुरुंगवासही होऊ शकतो.

पश्चिम मध्य रेल्वेने म्हटले आहे की, ट्रेनमध्ये आग पसरवणे किंवा ज्वलनशील वस्तू वाहून नेणे हा रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 164 नुसार दंडनीय गुन्हा आहे, ज्यासाठी पकडल्या गेलेल्या व्यक्तीला तीन वर्षांच्या कालावधीपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय एक हजार रुपयांपर्यंतचा दंड, किंवा दोन्हीही दिले जाऊ शकते. (हेही वाचा -Bank Locker New Rules: RBI ने बदलले बँक लॉकरचे नियम; ग्राहकांना 'असा' मिळणार फायदा, वाचा सविस्तर)

रेल्वेने जारी केलेल्या आदेशानुसार, यापुढे रॉकेल, सुके गवत, स्टोव्ह, पेट्रोल, रॉकेल, गॅस सिलिंडर, माचिस, फटाके किंवा प्रवासी ट्रेनच्या डब्यात आग पसरवणारी कोणतीही वस्तू घेऊन प्रवास करता येणार नाही. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वेने हा कठोर निर्णय घेतला आहे.

रेल्वे परिसरात धूम्रपान बंदी -

आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने आखलेल्या योजनेनुसार, रेल्वे प्रवासाव्यतिरिक्त कोणत्याही प्रवाशाला रेल्वेच्या आवारात धुम्रपान करता येणार नाही. असे करताना कोणी पकडले तर त्याला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय प्रवाशाला दंडही भरावा लागू शकतो.