आयकर विभागाकडून (Income Tax Department) आयकर रिटर्न सादर करण्यासाठी 31 डिसेंबर अंतिम मुदत देण्यात आली. याआधी आयकर रिटर्न करण्यास विलंब झाल्या हजार रुपयांचा दंड आकरला जात होता. मात्र, 31 डिसेंबरनंतर आयकर रिटर्न सादर केल्यास करदात्यांना दुप्पट म्हणजेच 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. करदात्यांना कपन्यांकडून फॉर्म 16 मिळण्यात उशीर आणि तांत्रिक अडचणींमुळे रिटर्न फायलिंगची मुदतवाढ करण्यात आली होती.
आयकर अधिनियम 1961 च्या 'कलम 234 एफ' नुसार 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्याला 5 हजार रुपयांचा दंड आणि त्यानंतर रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांना 10 हजारांचा दंड लावला जाईल. ज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपर्यंत आहे, अशा करदात्यांना विलंब शुल्क म्हणून 1 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. याशिवाय ज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न कर वजावटीचा लाभ घेतल्यानंतर करमुक्त असेल तर त्यांना रिटर्न फायलिंग करता दंड भरावा लागणार नाही. हे देखील वाचा- आजपासून आयकर विभाग कार्यालयाकडून नवा नियम; टॅक्सचोरी करून पळवाट शोधणार्यांना बसणार चाप