Noida: कोरोना झाला तर आयसोलेशनमध्ये ऑनलाइन ऑर्डर केले जेवण, जेवणात मिळाला सरडा, पाहा व्हिडिओ
(Photo Credit - Twiiter)

नोएडा एक्स्टेंशनमध्ये राहणारे कौस्तव कुमार सिन्हा आणि रिशा शर्मा यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. एकटे राहत असताना या जोडप्याकडे ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्याशिवाय पर्याय नव्हता. आजारपणाच्या अवस्थेत दोघेही झोमॅटोवरून फूड ऑर्डर करत होते. 14 जानेवारी रोजी जेव्हा दोघांनी झोमॅटोच्या माध्यमातून पंजाबी किचनमधून जेवण ऑर्डर केले तेव्हा ते त्यांच्यासाठी जबरदस्त होते. जेवताना रिशा यांची नजर ग्रेव्हीत पडलेल्या एका विचित्र वस्तूकडे गेली. त्यांनी पाहिले तर ग्रेव्ही मध्ये एक सरडा होता. हे पाहून दोघांचीही तारांबळ उडाली.

कोरोनामुळे सहजासहजी रुग्णालयात जाता येत नसल्याने प्रथम कौस्तव आणि रिशा यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांच्या सल्ल्याने दोघांनी उलट्या करून काही औषधे घेतली, त्यानंतर त्यांची प्रकृती सामान्य झाली. कौस्तव यांनी या संपूर्ण घटनेची माहिती झोमॅटो आणि रेस्टॉरंटला दिली असता त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. झोमॅटोने कौस्तव यांना याबाबत माहिती दिली की त्यांनी पंजाबी रसोईशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की येथे कोणतीही चूक नाही, जेवण आमच्या ठिकाणाहून बरोबर गेले आहे. तर कौस्तवकडे रेस्टॉरंटमधून येणाऱ्या जेवणाचे व्हिडिओ आणि फोटो आहेत.

त्याचवेळी झोमॅटोनेही हे प्रकरण गांभीर्याने न घेता कौस्तव यांना जेवणाचे पैसे परत करून हे संपूर्ण प्रकरण मिटवायचे आहे आणि ही गोष्ट सोशल मीडियावर टाकू नका असा सल्ला दिला. मात्र, कौस्तवने हे संपूर्ण प्रकरण ट्विटरवर शेअर करत पोलिसांत तक्रारही केली आहे.

16 जानेवारी रोजी कौस्तव आणि रिशा यांनी बिसरख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच अन्न निरीक्षकांकडे तक्रार केली. मात्र, रेस्टॉरंटवर अद्याप कारवाई झालेली नाही. त्याचवेळी रिशाने सांगितले की, आमच्यासोबत माझा लहान भाऊ आणि बहिणीनेही हे जेवण आधी खाल्ले होते. अन्न खाल्ल्यानंतर काही वेळातच माझ्या बहिणीला पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. मात्र, औषधे घेतल्यानंतर प्रकृती सामान्य झाली आणि वेळेत औषधे घेतल्याने आम्हाला काहीही झाले नाही.