बॅंकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छिणार्यांसाठी आता IBPS ने मोठी भरती जाहीर केली आहे. त्यानुसार, आता इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शनने विशेष अधिकारी या पदासाठी आता 1163 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यामध्ये कृषी क्षेत्र अधिकारी, आय टी अधिकारी, कायदा अधिकारी, राजभाषा अधिकारी, मार्केटींग ऑफिसर, मानव संसाधन / वैयक्तिक अधिकारी अशा विविध पदांचा समावेश आहे. 6 नोव्हेंबर 2019 पासून पदभरतीला सुरूवात झाली असून 26 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येऊ शकतो. 3 निवड टप्प्यातील निवड चाचाण्यांमधून ही उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
उमेदवारांसाठी प्रथम 28-29 डिसेंबर दिवशी पूर्व परीक्षा घेतली जाईल. त्याचा निकाल जानेवारी महिन्यात जाहीर केला जाईल. त्यानंतर 25 जानेवारी दिवशी ऑनलाईन माध्यमातून मुख्य परीक्षा पार पडेल. तर फेब्रुवारी महिन्यात मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या प्रक्रियेमधून उमेदवार निवडला जाईल.
कुठे कराल अर्ज?
वयाची पात्रता : 20-30 वर्ष
शैक्षणिक पात्रता: प्रत्येक पदासाठी वेगळी असल्याने अर्ज करण्यासाठी संकेतस्थळावर तपासा.
कसा कराल ऑनलाईन अर्ज?
स्टेप 1: ibps.in या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
स्टेप 2: online application च्या नोटीफिकेशनवर क्लिक करा.
स्टेप 3: आवश्यक माहिती भरल्यानंतर सबमीट करा.
स्टेप 4: अॅप्लिकेशन डाऊनलोड करून प्रिंट करा.
IBPS साठी 2 तासांची परीक्षा असेल तर त्यामध्ये 50 प्रश्न असतील. यामध्ये इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि रिझनिंग अशा विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. बॅंकिंग क्षेत्राशी निगडीत प्रश्न यामध्ये विचारले जातील. तसेच इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये या बॅंकेच्या परीक्षा पार पडणार आहेत.