Horrific Accident In Madhya Pradesh: मध्य प्रदेशात भीषण अपघात घडला आहे. एका व्यक्तीला गुटखा खाणे महागात पडले आहे, त्या वाहनाच्या चालकाने गुटखा थुंकण्यासाठी त्याचे डोके वाहनातून बाहेर काढले, त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या वाहनाने त्याच्या डोक्याला अशा प्रकारे धडक दिली की त्याचे डोके शरीरापासून वेगळे झाले. यासोबतच त्याचा हातही तुटून बाहेर पडला. असे सांगितले जात आहे की, 'हा अपघात इतका भीषण होता की, चालकाचे डोके निखळले आणि ते खाली पडले. ज्याने ही घटना पाहिली त्याला हा भयावह अपघात पाहिल्यानंतर झोप आली नसेल. आकाश मकासरे असे मृत चालकाचे नाव असून तो 22 वर्षांचा होता. तो बरवानी जिल्ह्यातील तलवाडा येथील रहिवासी होता. जोधपूरहून भाजी घेऊन तो खारगावला जात असताना हा अपघात झाला.
या घटनेनंतर चालक फरार झाला. अपघाताची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. ड्रायव्हर जोधपूरच्या दिशेने गेल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी चालकाचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा आकाशचा हात वाहनापासून काही अंतरावर पडला होता. यासोबतच त्याच्या मृतदेहाचे काही तुकडे पाहून घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांना धक्काच बसला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह व त्याचे तुकडे ताब्यात घेतले. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक एकाच बाजूने सुरू होते. त्यामुळे या अपघाताची माहिती समोर आली आहे.