Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. रविवारी उशिरा रात्री हा अपघात झाला. दोन भरधाव कारची एकमेकांना धडक झाल्याने ही दुर्घटना घडली आहे. ही घटना मानोटा गावाजवळ घडली आहे. कार अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर संपुर्ण गावात शोक पसरला आहे. कामानिमित्त बाहेर गावीत जात असताना चौघां मित्रांचा अपघाती मृत्यू झाला. हेही वाचा-पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ; नागरिकांना घरात घुसून मारहाण, वाहनांची तोडफोड
मिळालेल्या माहितीनुसार, लकी, सलमान, शाहरुख आणि शाहनवाज अशी अपघातात मृत पावलेली तरुणांची नावे आहेत. अपघातानंतर पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघे मित्र काही कामानिमित्त गजरौलाहून बुलंदशहरला जात असताना हा अपघाता झाला. दोन्ही कार वेगवान होत्या. दोन कारची एकमेकांना धडक झाली. कारची धडक इतकी भीषण होती की, दोन्ही कारचा चुराडा झाला.
अमरोहा में दर्दनाक घटना। दो कारों की आमने-सामने की टक्कर में फेमस युटुबर लक्की, शाहरुख, सलमान, शाहनवाज की मौत। दोस्त का बर्थडे पार्टी मना कर वापस लौट रहे थे, यूट्यूब पर #Round2WorldOfficial चैनल पर कॉमेडी वीडियो बनाते थे। हसनपुर गजरौला मार्ग पर हुआ हादसा। @amrohapolice… pic.twitter.com/rUePwN6ZhM
— Awareness News (@AwarenessNews1) June 10, 2024
अपघातात एका कारमधील चौघे जण ठार झाले. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेतले आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी अमरोहा येथे पाठवण्यात येणार आहे. अहवाल आल्यानंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत झालेले चौघे जण युट्यूबर होते. अपघातानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपासणी सुरु केली आहे.