हरयाणा येथे धुक्यामुळे भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

हरयाणा (Haryana) येथे धुक्यामुळे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

अंबाला- चंदीगड मार्गावर शनिवारी सकाळी ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या मार्गावर खूप धुके असल्याने या दोघांमध्ये भीषण अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून अपघातीतल व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले.

यापूर्वी ही हरयाणा येथे दाट धुक्यामुळे 50 गाड्यांनी एकमेकांना धडक दिल्याच्या घटना घडल्या होत्या.तसेच 24 डिसेंबर रोजी झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता.