Nitin Gadkari (फोटो सौजन्य - फेसबुक)

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि लोकसभेचा निकाल लागल्यानंतर अनेक वेळा पंतप्रधान होण्याच्या ऑफर(Nitin Gadkari PM Post) मिळाल्या होत्या. गडकरींनी इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत हे विधान केलं. पंतप्रधानपद स्वीकारण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्याने पाठिंबा दिला होता. मात्र, 'मी माझ्या विचारधारेशी तडजोड करणार नाही. ऑफर स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पंतप्रधान होणे हे माझे ध्येय नाही. मी माझ्या विचारधारेवर विश्वास ठेवून जगत आहे,' असे ते म्हणाले.

जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, पंतप्रधान होण्याचा प्रस्ताव विरोधी पक्षातून शरद पवार किंवा सोनिया गांधी यांच्याकडून आला होता का? यावर गडकरींनी भाष्य करण्यास नकार दिला. आपण या विषयावर काहीही बोलणार नाही. लोकांना कोणत्या चर्चा करायच्या त्या ते करण्यास मोकळे असल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा:Nitin Gadkari PM Offer: नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ )

'मी काही बनण्यासाठी राजकारणात आलो नाही. कोणीही कोणाला पुढे जाऊ देत नाही, पण मला कोणतीही अडचण नाही.' पंतप्रधान होण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेच्या प्रश्नावर ते म्हणाले की, 'माझी कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. जर मी त्याच्या लायक असेल तर मला ते मिळेल.'

नितीन गडकरी हे गेल्या १० वर्षांपासून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहेत. एवढ्या अनुभवानुसार जास्त मंत्रिपद मिळावेत या त्यांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, 'माझा 5 टक्के राजकारण आणि 95 टक्के समाजसेवेवर विश्वास आहे. मी कधी कोणाकडे काही मागालयला जाणार नाही.'