Gyanvapi Case

Gyanvapi Case:उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्हा न्यायालयात शनिवारी ज्ञानवापी खटल्याची सुनावणी सुरू होती. यावेळी एक अनोखी घटना घडली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुनावणीदरम्यान एक माकड सीजेएम कोर्टात शिरलं आणि टेबलावर बसले. जवळपास तासभर सुनावणी सुरू होती आणि यावेळी माकड कोर्टरूममध्ये उपस्थित होते. त्याने कोणाचेही नुकसान केले नाही किंवा कोणत्याही कागदपत्राशी किंवा फाईलशी छेडछाड केली नाही. सुनावणी संपल्यानंतर माकड आपोआप कोर्टरूममधून बाहेर पडले. न्यायालयाच्या आवारात ज्ञानवापी प्रकरणापेक्षा या माकडाची जास्त चर्चा झाली. अनेकांनी ते आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली.

माकड पोहोचले वाराणसी मंदिरात

हिंदू पक्षाने सांगितले हे शुभ चिन्ह

हिंदू पक्षाच्या वकिलांनी ही घटना एक चांगला संकेत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी याचा संबंध अयोध्या राम मंदिर प्रकरणाशी जोडला, जिथे एका माकडाने न्यायालयाच्या आवारात असेच केले होते. ही घटना दैवी चिन्ह ठरू शकते आणि काशीच्या बाजूने निकाल अपेक्षित असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.

पुढील सुनावणी १८ जानेवारीला

ज्ञानवापी प्रकरणाची पुढील सुनावणी आता १८ जानेवारीला होणार आहे. मात्र, या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारातील वातावरण शांत झाले आणि चर्चेचा प्रमुख विषय बनला आहे.