Ram Rahim Parole: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग (Gurmeet Ram Rahim Singh) पुन्हा एकदा तुरुंगाबाहेर आला आहे. गुरमीत राम रहीम सिंगला शनिवारी पुन्हा पॅरोल मिळाला. गुरमीत सिंगला तीन महिन्यांत दुसऱ्यांदा पॅरोल मिळाला आहे. पॅरोल मिळाल्यानंतर राम रहीम बरनावा डेराकडे रवाना झाला. यादरम्यान त्यांची मुलगी हनीप्रीत राम रहीमला घेण्यासाठी पोहोचली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरमीत राम रहीमने पॅरोलसाठी अर्ज केला होता. गुरमीत राम रहीमने 25 जानेवारी रोजी शाह सतनाम सिंह यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहण्यासाठी अर्ज केला होता. डेरामुखी यांनी 25 जानेवारीला भंडारा आणि सत्संगासाठी तुरुंग प्रशासनाकडे अर्ज पाठवला होता आणि सिरसा येथे जाण्याची परवानगी मागितली होती, ज्याला मंजुरी देण्यात आली आहे. यावेळी राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. (हेही वाचा -Ram Rahim Case Verdict: पत्रकाराच्या हत्येप्रकरणी बाबा राम रहीम सह चार आरोपी दोषी, शिक्षेची सुनावणी 17 जानेवारी रोजी होणार)
#WATCH | Dera Sacha Sauda chief Gurmeet Ram Rahim Singh released from Sunaria prison in Rohtak district of Haryana after being granted 40-day parole.
He has been convicted in a rape case. pic.twitter.com/6SK000mK5b
— ANI (@ANI) January 21, 2023
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगला त्याच्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला राम रहीम सध्या हरियाणाच्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बंद आहे. या शिक्षेदरम्यान राम रहीम अनेकवेळा पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला आहे.