Gujarat News : गुजरातच्या राजकोटमधून गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करताना धरणात बुडून एका काका आणि पुतण्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. तर एकीकडे गुजरात मध्ये काका पुतण्याचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. विसर्जन करताना काका पुतण्या आणि आणखी एक तरुण मुलगा धरणात उतरले होते. तेव्हा कुटूंबाच्या सदस्यानी व्हिडिओ शुट केला.
शहरातील कोठारिया रोडवर असलेल्या मणिनगर सोसायटीत आजी धरणावर गणेश विसर्जन सोहळ्यासाठी जमलेल्या मेळाव्यादरम्यान राजकोटमध्ये ही घटना घडली. गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी तीन जण पाण्यात उतरले. खोल प्रवाहाच्या तडाख्यात दोघे वाहून गेल्याने ही दुर्घटना घडली.
રાજકોટ: આજી ડેમમાં પરિવારની સામે જ મામા ભાણેજના ડૂબી જવાથી મોત
Source: Scial Media #ViralVideos pic.twitter.com/jWQHCa5CbE
— DP NEWS (@dpnewsgujarati) September 23, 2023
या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाले. दोघांना शोधण्यासाठी शोध मोहिम सुरु केली आहे. काही वेळानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात रामभाई (३३) आणि हर्ष (१९) अशी मृतांची ओळख पटली असून ते दोघे नातेवाईक होते. या शोकांतिकेने त्यांचे कुटुंब हादरून गेले असून, त्यांच्यावर शोककळा पसरली आहे. सध्या, काका आणि पुतण्याचे मृतदेह राजकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहेत, जिथे मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोस्टमार्टम तपासणी केली जाईल.