गुजरातचे मंत्री Ishwarsinh Patel यांना कोरोनाची लागण; दोन दिवसांपूर्वीच घेतली होती COVID-19 Vaccine
Gujarat Minister Ishwarsinh Patel (Photo Credits: Twitter)

भारतात कोरोना (Coronavirus) अटोक्यात येत असल्याची चिन्ह निर्माण झाली असताना देशात पन्हा एकदा रुग्ण वाढू लागले आहे. देशात महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujrat), पंजाब (Panjab), कर्नाटक (karnataka), तामिळनाडू (Tamil Nadu) या राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. देशात जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला धीम्या गतीने झालेल्या लसीकरण मोहिमेला आता चांगलाच वेग आला आहे. यातच कोरोना प्रतिबंध लस घेतल्यानंतरही गुजरातचे क्रिडामंत्री इश्वरसिंह पटेल (Ishwarsinh Patel) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.

इश्वरसिंह पटेल यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून यासंर्दभात माहिती दिली आहे. त्यांच्यावर यू. एन मेहता रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, 13 मार्च रोजी त्यांनी कोरोनाची लस घेतली होती. मात्र, तरीही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे देखील वाचा-COVID19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांमध्ये 24,492 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची वाढ, 131 मृत्यू

ईश्वरसिंह पटेल यांचे ट्वीट-

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या 5 राज्यांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण वाढत आहेत. देशात गेल्या 24 तासांत एकूण नवीन प्रकरणांपैकी 78.41 टक्के या राज्यांमधील आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार आहेत.