गुजरातच्या (Gujarat) सुरतमधील (Surat) रघुवीर मार्केटमध्ये (Raghuveer Market) भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Tenders) तब्बल 40 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. आज पहाटे ही घटना घडली. या मार्केटच्या 10 मजली इमारतीच्या 7 व्या मजल्यावर आग लागली आहे.
सुरतमधील रघुवीर सेलियम मार्केटमध्ये पहाटेट्या सुमारास भीषण आग लागली. अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (हेही वाचा - एक जून पासून भारतात 'एक देश, एक रेशन कार्ड' योजना: रामविलास पासवान; जाणून घ्या काय आहे ही योजना)
Gujarat: Fire breaks out in Raghuveer Market in Surat. 40 fire tenders at the spot pic.twitter.com/k0FQRpyFTM
— ANI (@ANI) January 21, 2020
सुरतमध्ये मोठ्या प्रमाणात कपड्यांचा व्यापार चालतो. काही दिवसांपूर्वी सुरतमधील तक्षशीला या कमर्शियल इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत कोचिंग सेंटरमधील काही विद्यार्थी अडकले होते. या आगीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच दिल्लीमध्ये अनाज मंडी येथे लागलेल्या आगीत मोठी जीवितहानी झाली होती.